Maharashtra Weather : राज्यात पुढील काही तास महत्त्वाचे, 'या' जिल्ह्यांना दुहेरी संकट

मुंबई तक

• 05:00 AM • 22 Mar 2026

Maharashtra Weather : राज्यात सध्या हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. मार्चमध्ये उन्हाच्या झळांहून आता राज्यातील काही ठिकाणी अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत आहे. मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यात गारपीटसह वादळी पाऊस होतोय. तर उष्णतेचा पारा चाळीशी पार आहे. जाणून घ्या हवामान विभागाचा महत्त्वाचा अंदाज.

Maharashtra weather

Maharashtra weather

Google CTA

बातम्या हायलाइट

point

राज्यात सध्या हवामानात सातत्याने बदल

point

राज्यातील काही ठिकाणी अवकाळी पावसाचा धुमाकूळ

Maharashtra Weather : राज्यात सध्या हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. मार्चमध्ये उन्हाच्या झळांहून आता राज्यातील काही ठिकाणी अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत आहे. मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यात गारपीटसह वादळी पाऊस होतोय. तर उष्णतेचा पारा चाळीशी पार आहे. जाणून घेऊयात 22 मार्च 2026 रोजी हवामानाचा अंदाज. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : अशोक खरात प्रकरण: 2 मित्र, 2 FIR आणि कंबरेजवळ घेतलेले पाय.. खळबळ उडवून देणारी Inside Story

कोकण

कोकण विभागात पावसाचं सावट नसेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तसेच उष्ण आणि दमट हवामानाचा धोका वाढण्याची अधिक शक्यता आहे. 22 मार्च रोजी हवामान उष्ण आणि दमट राहील. अशातच हवामान विभागाने कोकणासह मुंबईला यलो अलर्ट जारी केला. 

मध्य महाराष्ट्र 

मध्य महाराष्ट्रात देखील हवामान विभागाने अवकाळी पावसाचा धोका कमी राहील असा अंदाज वर्तवला. पुण्यासह सातारा आणि अहिल्यानगरात हवामान कोरडे राहण्याची शक्यता वर्तवली. सोलापूर, सांगली आणि कोल्हापूरमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. 

मराठवाडा

मराठवाड्यात रविवारी हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. या विभागातील छत्रपती संभाजीनगरासह कोणत्याही जिल्ह्याला हवामान विभागाचा महत्त्वाचा अलर्ट जारी केला आहे. 

हे ही वाचा : धाराशिवमध्ये लोककलेच्या नावावर वेश्या व्यवसाय, 4 कला केंद्रांवर घडला प्रकार; 'असं' बाहेर आलं प्रकरण

विदर्भ 

विदर्भात गेल्या काही दिवसांपासून गारपीट आणि वादळी पावसानं हाहाकार माजवला आहे. नागपूरसह विदर्भातील इतर काही जिल्ह्यांमध्ये शेतीचं मोठं नुकसान झाल्याची माहिती आहे.