Maharashtra Weather : राज्यात मान्सून गायब झाल्याचं चित्र दिसून येत आहे. मात्र, हवामान विभागाने अद्यापही काही भागांना हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मुंबई, पुणे सारख्या शहरांत कडाक्याचे ऊन पडताना दिसत आहे. तर काही भागांत विजांसह हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात येते. अशातच जाणून घ्या हवामान विभागाचा एकूण अंदाज पुढीलप्रमाणे...
ADVERTISEMENT
हे ही वाचा : मद्यधुंद लेकाचा दारूवरून वाद, सपासप वार करून सावत्र वडिलांना संपवलं
कोकण
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार येथे मेघगर्जनेसह पाऊस किंवा हलक्या पावसाची शक्यता आहे. नाशिकमध्ये हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. अहिल्यानगर, नाशिक घाटमाथा परिसरात मेघगर्जनेसह पाऊस आणि काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविली आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर येथे हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. सातारा, सातारा घाटमाथा, सांगली आणि सोलापूरमध्ये मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
मराठवाडा
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर आणि लातूर येथे मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता वर्तविली आहे. जालना, परभणी, हिंगोली, नांदेड येथे कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. धाराशिव या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे.
हे ही वाचा :
विदर्भ
विदर्भातील कोणत्याच जिल्ह्याला पावसाचा कोणताच अलर्ट जारी केला नाही.
ADVERTISEMENT












