Crime News: खरंतर, लग्न हे सात जन्मांचं बंधन असून त्यात आयुष्यभर एकत्र राहण्याची वचनं दिली जातात. परंतु, काही जण या पवित्र नात्याला खेळ समजतात आणि वासनेच्या भरात भलतंच काहीतरी करुन बसतात. बिहारच्या पाटणामधून अशीच एक विचित्र आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील एका तरुणाने 8 वेळा लग्न केलं आणि त्याच्या आठव्या पत्नीसोबत झालेल्या वादातून ही बाब उघडकीस आली. नेमकं प्रकरण काय? सविस्तर जाणून घ्या.
ADVERTISEMENT
पंचायतीत 7 वेळा लग्न केल्याचा खुलासा
पाटणा शहराला लागून असलेल्या अनीसाबादमध्ये ही घटना घडल्याची माहिती समोर आली. येथे 2024 मध्ये एका महिला पत्रकाराचं राकेश कुमार नावाच्या दुकानदारासोबत लग्न झालं होतं. मात्र, लग्नानंतर राकेशने आपल्या पत्नीला सतत मारहाण करण्यास सुरुवात केली. पतीच्या या कृत्याला वैतागून पीडितेने पंचायतीत हा मुद्दा उपस्थित केला. आणि त्यावेळी राकेशने यापूर्वी 7 वेळा लग्न केल्याचा खुलासा झाला. राकेशबद्दल ही माहिती कळताच त्याच्या पत्नीने पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. मात्र, पोलिसांनी प्रकरणाचं गांभीर्य लक्षात न घेता राकेशवर कारवाई केली नसल्याचा आरोप आहे.
हे ही वाचा: अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचं मुंडकंच छाटलं अन्... नंतर न्यूज चॅनलला सांगितली भलतीच गोष्ट
महिला आयोगाकडे मागितली मदत
पोलिसांनी याविरोधात काही ठोस पाऊल उचललं नसल्याने पीडितेने महिला आयोगाकडे मदत मागितली. मात्र, त्यावेळी पती सुनावणीला हजर राहिला नाही आणि त्यानंतर एसपी यांना पत्र लिहिण्यात आलं असून संबंधित पोलिस स्टेशनला या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती करण्यात आली आहे. तक्रार करताना पीडित महिलेने सांगितले की, 14 डिसेंबर 2024 रोजी तिचे लग्न मोहनिया, कैमूर येथील राकेश कुमारशी झालं होतं. राकेश फोटो स्टेट दुकान चालवत असल्याची माहिती आहे.
लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून मारहाण...
सासरच्या घरी आल्याच्या दुसऱ्या दिवसापासून पीडितेला मारहाण करण्यात आल्याचा आरोप महिलेने केला. इतकेच नव्हे तर12 जानेवारी 2024 रोजी तिला जाळून मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचंही सांगण्यात आलं. या मुद्द्यावर गावकऱ्यांची पंचायत झाली आणि त्याच वेळी राकेशने यापूर्वी सात वेळा लग्न केल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं.
हे ही वाचा: भर बाजारात झाडल्या गोळ्या अन्... 15 वर्षीय प्रेयसीसोबत तरुणाने 'असं' का केलं?
महिला आयोगाच्या अध्यक्षा काय म्हणाल्या?
पतीने सात लग्न केल्याचं कळल्यानंतर मोहनिया पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याचं पीडितेनं सांगितलं. मात्र, पोलीस ठाण्यात गेली असता कोणतीच कारवाई करण्यात आली नसल्याचं देखील तिने सांगितलं. आता महिलेने बिहार राज्य महिला आयोगाकडे मदत मागितली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने पत्रकारितेचा कोर्स केला आहे. महिला या प्रकरणासंदर्भात आयोगाच्या अध्यक्षा म्हणाल्या की, पीडितेचा पती राकेश कुमारला दोन दिवस आयोगात बोलावण्यात आले होते. पण तो हजर राहिला नाही. त्यामुळे महिला आयोगाने कैमूर एसपींना पत्र लिहिलं असल्याची माहिती समोर आली.
ADVERTISEMENT
