15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा बॉयफ्रेंडला नेमका कसला आलेला राग? गर्लफ्रेंडला भर मार्केटमध्ये संपवलं...
राजधानी दिल्लीमध्ये सोमवारी (4 ऑगस्ट) एका मुलीवर भर बाजारात गोळ्या झाडून तिची हत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. जहांगीरपुरी परिसरात घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
भर बाजारात प्रेयसीवर गोळ्या झाडून हत्या
प्रियकराने प्रेयसीसोबत असं काय केलं?
Murder Case: राजधानी दिल्लीमध्ये सोमवारी (4 ऑगस्ट) एका मुलीवर भर बाजारात गोळ्या झाडून तिची हत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. जहांगीरपुरी परिसरात घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, एक 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत बाजारात गेली असता तिच्या प्रियकराने तिथे जाऊन भर बाजारात तिच्यावर गोळ्या झाडून हत्या केली. पोलिसांनी प्रकरणासंदर्भात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु असल्याची माहिती आहे.
मैत्रिणीसोबत गेली बाजारात अन्...
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एक 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत जहांगीरपुर बाजारात स्नॅक्स आणण्यासाठी गेली होती. रात्री 8:10 वाजताच्या सुमारास पीडितेचा प्रियकर बाजारात पोहचला आणि तिच्यावर गोळ्या झाडून तिची हत्या केली.
भर बाजारात प्रेयसीवर गोळ्या...
प्रकरणातील आरोपी प्रियकराचं नाव आर्यन असल्याची माहिती समोर आली आहे. प्रेयसी बाजारात गेल्याचं कळताच आरोपी त्याच्या मित्रासोबत घटनास्थळी पोहचला. त्यावेळी बाजारातील डी-ब्लॉक परिसरातील डॉ. केके महाजन क्लिनिक समोर आपल्या प्रेयसीवर गोळ्या झाडल्या.
हे ही वाचा: 6 महिन्यात 7 वेळा शिक्षण विभाग तोंडघशी कसा पडलाय, शिक्षण विभागात खेळखंडोबा का?
2 ते 3 गोळ्या झाडल्याची माहिती
पीडितेला गोळी लागताच तिला तातडीने जहांगीरपुरच्या बीजेआरएम रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, त्यावेळी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.










