प्रेम, विश्वासघात आणि तंत्र-मंत्र.. बॉयफ्रेंडसाठी 'तिने' सगळा कार्यक्रमच करून टाकला!

मुंबई तक

उत्तर प्रदेशातील अलीगढमध्ये प्रियकराला मिळवण्याच्या नादात एका महिलेने तिच्या पतीची हत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे.

ADVERTISEMENT

पतीपासून वैतागलेल्या तबस्सुमने प्रियकराच्या नादात नको ते करुन बसली!
पतीपासून वैतागलेल्या तबस्सुमने प्रियकराच्या नादात नको ते करुन बसली!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

प्रियकरासाठी केली पतीची हत्या

point

आधी जादूटोणा अन् नंतर प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या

Crime News: उत्तर प्रदेशातील अलीगढमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. प्रियकराला मिळवण्याच्या नादात एका महिलेने तिच्या पतीची हत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहर हादरुन गेलं आहे. आरोपी महिलेने तिच्या प्रियकरासोबत मिळून पीडित पतीची निर्घृणपणे हत्या केली. नेमकी घटना काय? 

हे प्रकरण अलीगढमधील छर्रा पोलीस स्टेशन हद्दीतील असल्याची माहिती आहे. 29 जुलै रोजी युसूफ नावाचा एक तरुण अचानक बेपत्ता झाला. कुटुंबियांनी त्याचा खूप शोध घेण्याचा प्रयत्न केला पण कोणताच सुगावा हाती लागला नाही. मात्र, एका आठवड्यानंतर युसूफचा मृतदेह आढळला आणि त्यावेळी त्याची ओळख पटवणं देखील कठीण होतं. त्याची ओळख पटू नये, यासाठी शरीर अ‍ॅसिडने जाळण्यात आले. त्यानंतर पोलिसांच्या तपासात प्रेम, विश्वासघात आणि तंत्र-मंत्राच्या नावाखाली रचलेल्या भयानक कटाचे सत्य समोर आलं.

अर्धवट जळालेला मृतदेह

युसूफ बेपत्ता झाल्यानंतर त्याचा मोबाईल फोन सुद्धा बंद होता. रात्री उशीपर्यंत त्याचा काहीच पत्ता न लागल्याने कुटुंबियांनी छर्रा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. प्राथमिक तपासात, काहीच पुरावा हाती लागला नाही. मात्र, एका आठवड्यानंतर कासगंज जिल्ह्यातील ढोलाना परिसरात वीटभट्टीजवळ एक अर्धवट जळालेला मृतदेह सापडल्यानंतर या प्रकरणाला एक नवीन दिशा मिळाली.

गावकऱ्यांना संबंधित वीटभट्टीजवळील परिसरात दुर्गंधी येऊ लागल्यास त्यांनी पोलिसांना याबद्दल माहिती दिली. त्यावेळी पोलिसांनी दोरीने बांधलेले हात आणि शरीराचा वरचा भाग अ‍ॅसिडने जाळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. त्यावेळी मृतदेहाची ओळख पटवणं देखील अवघड होतं. पण पोलिसांनी मृतदेहाच्या फोटो आणि कपड्यांच्या आधारे छर्रा पोलिस ठाण्यातून बेपत्ता तरुणाची माहिती मिळवली असता युसूफचं नाव समोर आलं. युसूफच्या वडिलांनी मृतदेह पाहता क्षणी तो ओळखला आणि यानंतर त्यांनी पोलिसांना प्रकरणाबाबत माहिती दिली. 

हे वाचलं का?

    follow whatsapp