'तुम्ही जेवता ना @# तर नाही खात ना?', माधुरी हत्तीणीवरून हिंदुस्थानी भाऊने कोल्हापूरकरांना डिवचलं, शिवीगाळ करणारा Video केला पोस्ट!
Hindustani Bhau: कोल्हापूरमधील माधुरी हत्तीणीवरून सध्या बरंच राजकारण सुरू आहे. अशातच हिंदुस्थानी भाऊने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत कोल्हापूरकरांना डिवचलं आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: कोल्हापूरच्या नांदणी गावातील हत्तीण माधुरी हिला Vantara ला पाठवल्यानंतर कोल्हापूर तिला परत आणण्यासाठी एकवटलं आहे. Vantara विरुद्ध नंदणीतील मठ असा वाद सुरू असताना आणि मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वतः यामध्ये लक्ष घातलं असताना आता या सगळ्या वादात मीडिया इन्फ्ल्यून्सर हिंदुस्थानी भाऊने उडी घेतली आहे. माधुरी किंवा महादेवी हत्तींबद्दल व्हिडिओ करत त्याने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या व्हिडिओमध्ये त्याने अनंत अंबानींचं कौतुक केलं आहे. तर दुसरीकडे माधुरीला पुन्हा कोल्हापुरात पाठवण्याची मागणी करणाऱ्यांना अश्लाघ अशी शिवीगाळ केली आहे.
हिंदुस्थानी भाऊने त्याच्या 6 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये अनेक शिव्यांचा वापर केला आहे. यानंतर त्याला प्रचंड निगेटिव्ह कमेंट्स यायला सुरुवात झाली. कोल्हापूरकरांना शिव्या घातल्या म्हणून असंख्य कमेंट सुरू झाल्या. काही वेळानी हिंदुस्तानी भाऊने कमेंट सेक्शन बंद केलं तर आता यूजर्सने त्याच्या दुसऱ्या पोस्टवर जाऊनही लोक कमेंट करणं सुरू आहे.
पाहा हिंदुस्थानी भाऊ माधुरी हत्तीणीबाबत नेमकं काय म्हणाला...
'कोल्हापूरच्या माधुरी हत्तीचा मॅटर सुरू आहे. तर मी त्याची काही माहिती घेतली की काय झालं, काय नाही झालं.. माझे देखील कोल्हापुरात बरेच मित्र आहेत. त्यांच्याशी बोललो.. त्यावेळी समजलं की, यावर बरंच राजकारण सुरू आहे. कारण आता इलेक्शन आलं आहे तर राजकारण होणारच...'
'एवढ्या वर्षांपासून कोणताही राजकीय नेता हा माधुरीला पाहायला गेला होता का? तर कोणीच गेलं नव्हतं. पण आता या मुद्द्याला मोठं केलं जात आहे. कारण आता निवडणूक आली आहे.'










