बुलढाण्यात खळबळ! प्रेमप्रकरणातून आरोपीने निष्पाप तरुणावर बुलढाण्यात दिवसाढवळ्या चाकूने केले सपासप वार, काय घडलं?
Buldhana Crime : बुलढाणा येथे प्रेमप्रकरणातून एका तरुणावर चाकूने वार करत हत्या केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी 6 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

बातम्या हायलाइट

बुलढाण्यात धक्कादायक घटना

साथीदारांच्या मदतीने एका तरुणावर चाकूने सपासप वार

धक्कादायक कारण आलं समोर
Buldhana Crime : बुलढाणा येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने काही साथीदारांच्या मदतीने एका तरुणावर चाकूने सपासप वार केले. ही घटना बुलढाणा शहरातील चिखली रोड येथील हॉटेल ग्रीन लीफ येथे 1 ऑगस्ट रोजी घडली आहे. मृत्यू झालेल्या निष्पाप तरुणाचे सीन सुरेश जाधव (वय 19) असे नाव आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी 6 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. आरोपीने केलेल्या खूनाचं कारण आता समोर आलं आहे.
हे ही वाचा : पुण्यात आई अन् भावानेच लेकीचं केलं अपहरण, नंतर जावयाला जबर मारहाण, ऑनर किलिंगचं प्रकरण?
नेमकं काय घडलं?
घडलेल्या घटनेनुसार, बुलढाणा शहरातील चिखली रोड येथील हॉटेल ग्रीन लीफ येथे आरोपी देवराज माळी आपल्या साथीदारांना सोबत घेऊन आला होता. तिथेच सुरेश जाधव त्याच ठिकाणी उपस्थित होता. त्याच वेळी ही घटना घडली. संबंधित प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहेत. त्यामुळे ही घटना आता उघडकीस आली आहे.
हल्लेखोर देवराजने सनीला पाहिल्यानंतर त्याने आपल्या कंबरेतून धारदार चाकू काढला आणि सुरेश जाधववर हल्ला केला केल्यानंतर तो जखमी झाला. अशातच सुरेश जाधवचा मृत्यू झाला. हत्येदरम्यान, घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
बुलढाणा पोलिसांनी आज तकशी साधला संवाद
बुलढाणा पोलीस ठाण्याचे अधिकारी रवी राठोड यांनी आज तक या प्रसारमाध्यमाने माहिती दिली की, ज्याने हत्या केली त्या तरुणाचे एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. त्याचे आधीच संबंधित तरुणीशी ब्रेकअप झालं. त्यानंतर मृत्यू झालेल्या सनी जाधव आणि तरुणींचं एकमेकांशी प्रेमसंबंध होते.
हे ही वाचा : 'तुला जर माझ्याशी लग्न करायचं तर...' पतीचं बाहेर लफडं अन् पत्नीवर चाकूने 7 वेळा केले सपासप वार
याबाबतची माहिती आरोपी देवराजला कळाल्याने त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने सनी जाधवची हत्या केली. संबंधित प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपीसह 3 साथीदारांना एकूण 4 लोकांना अटक केली असून पोलीस पुढील प्रकरणाचा तपास करत आहेत.