पुण्यात आई अन् भावानेच लेकीचं केलं अपहरण, नंतर जावयाला केली जबर मारहाण, आंतरजातीय विवाहानंतर...
pune crime : पुण्यातील राजगुरूनगर जवळील असणाऱ्या खरपुडी येथे आंतरजातीय विवाह केल्याने उच्चशिक्षित दांम्पत्याला मारहाण केली.

बातम्या हायलाइट

पुरोगामी महाराष्ट्रात लज्जास्पद प्रकार

तरुणीला आणि जावयाला कुटुंबीयांनी केली बेदम मारहाण

कारण ऐकून उडेल थरकाप
pune crime : पुरोगामी महाराष्ट्रातील संस्कृतीचं माहेरघर असणाऱ्या पुणे शहरात लज्जास्पद प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील राजगुरूनगर जवळील असणाऱ्या खरपुडी येथे आंतरजातीय विवाह केल्याने उच्चशिक्षित दांम्पत्याला मारहाण केली. मारहाणीनंतर विवाहितेचं तिच्याच आई आणि भावांनी अपहरण केलं. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे आता पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. पीडितेचं नाव प्राजक्ता शिंदे (वय 28) असे आहे. तर तिच्या पतीचं नाव विश्वनाथ (वय 43) असे आहे.
हे ही वाचा : 'तुला आणि तुझ्या 4 महिन्यांच्या बाळाचा...', स्वस्तात मोबाईल देतो असं दुकानदाराने सांगितलं अन् कपड्यांच्या दुकानातच लुटली अब्रु
तरुणीला बेदम मारहाण
हा ऑनर किलिंगचा प्रकार असल्याचं बोलले जात आहे. हा देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे होऊनही आजही समाजात जातीवादाचा प्रश्न अद्यापही मिटलेला नाही. संबंधित प्रकरणाच्या व्हिडिओत दिसतंय की, या प्रकरणामुळे कुटुंबीयांनी तरुणीला बेदम मारहाण केली आणि नंतर तिचं लैंगिक शोषण केलं आहे.
प्राजक्ता शिंदे आणि विश्वनाथ यांच्या लग्नाला 5 ऑगस्ट 2025 रोजी एक वर्षे पूर्ण झाले. आंतरजातीय लग्न केल्यामुळे प्राजक्ताचे कुटुंबातील सदस्य संतापले. त्यांनी 3 ऑगस्ट रोजी प्राजक्ताच्या कुटुंबाला बेदम मारहाण केली आणि नंतर प्राजक्ताचे अपहरण केले. या मारहाणीत जावई विश्वनाथला गंभीर जखमी केले आहे. त्यानंतर विश्वनाथने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
हे ही वाचा : 'तुला जर माझ्याशी लग्न करायचं तर...' पतीचं बाहेर लफडं अन् पत्नीवर चाकूने 7 वेळा केले सपासप वार
ऑनर किलिंग असल्याची भीती
दरम्यान, राज्यात मोठ्या प्रमाणात आंतरजातीय विवाहातून अनेकदा सैराटसारखे धक्कादायक प्रकरणं समोर येऊ लागली आहेत. याचमुळे अनेक जोडप्यांनी आपला जीव गमावला आहे. पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटनांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. दरम्यान हे प्रकरण ऑनर किलिंग असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
संबंधित घटनेवर प्रश्नोत्तरे
प्रश्न : ही घटना कुठे घडली?
पुण्यातील राजगुरूनगर जवळील असणाऱ्या खरपुडी येथे घडली.
प्रश्न : उच्चशिक्षित दांम्पत्याला मारहाण का केली?
आंतरजातीय विवाह केल्याने मारहाण केली.