बहिणीचा दीर खूपच आवडला, अनैतिक संबंधही.. पण नंतर घडलं भयंकर अन् गेला भलत्याचाच जीव
जवळपास 1 वर्ष जुन्या खून प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने पीडित व्यक्तीची पत्नी, तिचा प्रियकर आणि आरोपी महिलेच्या बहिणीच्या दीराला अटक केली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, महिलेचे अनैतिक संबध होते आणि म्हणून तिने तिच्या पतीची सुपारी देऊन हत्या केली होती.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
प्रियकराच्या साथीने महिलेनं पतीला संपवलं
50,000 रुपयांची सुपारी दिली अन् हत्येचा कट...
Crime News: जवळपास 1 वर्ष जुन्या खून प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने पीडित व्यक्तीची पत्नी, तिचा प्रियकर आणि आरोपी महिलेच्या बहिणीच्या दीराला अटक केली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, महिलेचे अनैतिक संबध होते आणि म्हणून तिने तिच्या पतीची सुपारी देऊन हत्या केली होती. क्राइम ब्रांच फरार आरोपीच्या शोधात दिल्लीतील अलीपूरला पोहोचल्यामुळे या 1 वर्ष जुन्या केसचा उलगडा झाला.
1 वर्षापासून फरार आरोपीचा शोध...
खरंतर, दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी एक पथक तयार केले. हे पथक न्यायालयाने फरार घोषित केलेल्या प्रीतम प्रकाशचा शोध घेत होते. प्रीतम सुमारे 1 वर्षापासून बेपत्ता होता. त्याच्याविरोधात ट्रक लुटल्याचे जवळपास 10 गुन्हे दाखल होते, त्यापैकी एका प्रकरणात प्रीतमला न्यायालयाने फरार घोषित केले होते.
अचानक फोन अॅक्टिव्ह झाला अन्...
बरेच प्रयत्न करुनही प्रीतमचा शोध लागत नव्हता आणि अशातच 30 जुलै रोजी त्याचा मोबाईल फोन अचानक चालू झाला. मोबाईल हँडसेट जुना होता, पण सिम नवीन होता. मोबाईल फोन अॅक्टिव्ह होताच दिल्ली पोलीस फोन ट्रॅक करत असताना दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक अलीपूर परिसरात पोहोचले आणि तिथून एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले.
प्रियकराच्या साथीने पतीच्या हत्येचा कट
ज्या व्यक्तीकडून प्रीतमचा फोन जप्त करण्यात आला, त्याचं नाव रोहित असल्याचं समोर आलं. रोहितने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी त्याची काटेकोरपणे चौकशी केली असता तो फोन प्रीतमचा असल्याचं त्याने सांगितलं. तसेच, 1 वर्षापूर्वी प्रीतमची हत्या झाली असून स्वत: रोहित आणि प्रीतमची पत्नी सोनियाने त्याच्या हत्येचा कट रचल्याचं देखील त्याने पोलीस चौकशीत सांगितलं.










