'दुकानावर आलेल्या एकाही बाईला मी सोडत नाही..', तरूणींवर लैंगिक अत्याचार करणारा वासनांध दुकानदार
Crime News : आरोपी दुकानदाराने एका महिलेला तिच्या 4 महिन्यांच्या बाळासह जीवे मारण्याची धमकी देत लज्जास्पद कृ्त्य केलं. महिलेच्या एकूण तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी दुकानदार विकास कुमारला बेड्या ठोकल्या आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
देशातील महिलेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
दुकानदाराने महिलेला जीवे मारण्याची दिली धमकी
नेमकं काय घडलं?
Crime News : देशातील महिला सुरक्षित आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण देशात महिलांचं मोठ्या प्रमाणात लैंगिक शोषण सुरू आहे. अशीच एक घटना पाटणा येथील बारह पोलीस ठाणे अंतर्गत घडली आहे. या घटनेच्या दरम्यान, आरोपी दुकानदाराने एका महिलेला तिच्या 4 महिन्यांच्या बाळासह जीवे मारण्याची धमकी देत लज्जास्पद कृत्य केलं. महिलेच्या एकूण तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी दुकानदार विकास कुमारला बेड्या ठोकल्या आहेत. या संदर्भात, महिलेनं पोलिसांना सांगितलं की, ती पोस्ट ऑफिस लेनमधील मोबाईल दुकानात मोबाईल खरेदी करण्यास गेली असताना ही घटना घडली.
हे ही वाचा : मंगळ ग्रहाने राशी बदलली 'या' राशीच्या लोकांना होणार धनाचा लाभ, जाणून घ्या तुमच्या राशीत काय लिहिलं?
दरम्यान, दुकानदार विकास कुमारने तिला 4 हजार 800 रुपयांना मोबाईल फोन देतो असे सांगितले असता, महिलेनं पैसे दिले. त्यानंतर, महिलेला मोबाईल देण्याच्या बहाण्याने, मोबाईल दुकानदार विकासने तिला बिचलिगली येथील एका कपड्यांच्या दुकानाच्या वरच्या खोलीत नेले. त्यानंतर त्याने तिच्या चार महिन्यांच्या लहान बाळाला जीवे मारण्याची धमकी देऊन महिलेचं लैंगिक शोषण केले.
या घटनेनंतर महिला आरडाओरड करू लागली, पण दुकानदाराने कसलीही दया दाखवली नाही. त्यानंतर, आरोपीने ही घटना इतर कोणाला सांगितल्यास तिला मारण्याची धमकी दिली. पीडित महिलेचा पती हा गुजरातमध्ये काम करतो, ही माहिती दुकानदाराला कळाल्यानंतर त्याने पीडित महिलेचा गैरफायदा घेतला.
दुकानदाराने दिली धमकी
महिलेचं म्हणणे आहे की, दुकानदाराने तिला अनेकदा धमकी दिली होती की तो त्याच्या दुकानात आलेल्या महिलेला सहजासहजी सोडत नाही. महिलेनं दिलेल्या जबाबानुसार पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली आहे. महिलेच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता कलम 64 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.










