Video Of Cloudburst: असा प्रलय तुम्ही कधीही नसेल पाहिला, निसर्ग कोपला अन् घरच्या घरं नेली वाहून
Video Of Uttarkashi Cloudburst: उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे मोठी ढगफुटी झाली. ज्यानंतर पाण्याचा प्रचंड लोंढा पर्वतावरून वेगाने वाहत आला. ज्यामुळे पायथ्याशी असणारी अनेक गावं ही नष्ट झाली आहेत.
ADVERTISEMENT

उत्तरकाशी: उत्तराखंडमधील उत्तरकाशीतील हरसिल येथील भारतीय लष्करी छावणीपासून सुमारे 4 किमी अंतरावर असलेल्या धारली गावात मंगळवारी दुपारी 1.45 च्या सुमारास ढगफुटीनंतर प्रचंड हाहाकार माजला. ढगफुटीनंतर आलेल्या भीषण पुरात मोठी जीवितहानी झाली आहे. पण अद्याप अधिकृत आकडा समोर आलेला नाही. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एकूण 50 हून अधिक लोक बेपत्ता असल्याचं समजतं आहे.
या पुरामुळे पवित्र गंगोत्री धामशी जोडलेला सर्व रस्त्यांशी संपर्क तुटला आहे. या आपत्तीमुळे पाणी आणि ढिगाऱ्यांचा इतका पूर आला की संपूर्ण परिसर पाण्याखाली गेला. ज्यानंतर अनेक एजन्सींना आपत्कालीन मदतीसाठी पाठवण्यात आले आहे.
एका प्रत्यक्षदर्शीने इंडिया टुडे टीव्हीला सांगितले की, "हॉटेलपासून बाजारपेठेपर्यंत सर्व काही उद्ध्वस्त झाले आहे. मी यापूर्वी कधीही अशी आपत्ती पाहिली नाही."
हरी शिला पर्वताच्या सात ताल परिसरातून खीर गंगा वाहते, तिथेच ही ढगफुटी झाली आहे. उजवीकडे धाराली परिसर आहे, तर डावीकडे हर्षिलच्या तेल घाट येथे आर्मी कॅम्प आहे. या अपघाताच्या वेळी स्थानिक आणि पर्यटकांसह 200 हून अधिक लोक धारली येथे उपस्थित होते.










