महिलेने पतीसोबत नको ते केलं, मुलगी आणि ब्रॉयफ्रेंडचीही साथ.. 'त्या' कानामुळे गुपित आलं समोर!

मुंबई तक

Today Murder Case Viral News :  आसामच्या डिब्रूगढ जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील एका व्यक्तीची घरातच निर्घृण हत्या करण्यात आली.

ADVERTISEMENT

सुलतानपूर हत्याकांड
सुलतानपूर हत्याकांड
social share
google news

बातम्या हायलाइट

point

उद्योगपतीची त्याच्या पत्नीने अन् मुलीने केली हत्या

point

सुरुवातीला सांगितलं..हार्ट अटॅकने मृत्यू

point

पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर

Today Murder Case Viral News: आसामच्या डिब्रूगढ जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील एका व्यक्तीची घरातच निर्घृण हत्या करण्यात आली. जेव्हा या हत्याप्रकरणाची पाळेमुळे समोर आली, तेव्हा सर्वांनाच हादरा बसला. धक्कादायक म्हणजे या हत्येमागे त्या व्यक्तीची पत्नी आणि तिच्या अल्पवयीन मुलाचा हात होता. उत्तम गोगाई असं मृत व्यक्तीचं नाव आहे.

कुटुंबियांनी दावा केला होता की, त्या व्यक्तीचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला. पण जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेहाची स्थिती पाहिली, तेव्हा त्यांचा संशय आणखी बळावला. मृताच्या कानावर कापलेली खूण दिसल्यावर पोलिसांना संशय आला की, हा मृत्यू नैसर्गिकरित्या झालेला नाहीय. तर खतरनाक प्लॅन करून हत्या केली गेलीय. 

सुरुवातीला सांगितलं..हार्ट अटॅकने मृत्यू

25 जुलै रोजी डिब्रूगढच्या जमीरा परिसरात लाहोन गावात राहणाऱ्या उत्तम गोगाईचा मृतदेह त्यांच्याच घरी आढळला. जेव्हा त्यांच्या भावांना याबाबत खबर लागली, तेव्हा ते तातडीनं घरी पोहोचले. पत्नी आणि मुलीने त्यांना सांगितलं की, उत्तम गोगाईचा मृत्यू अचानक प्रेशर वाढल्याने हार्ट अटॅकने झाला. पण जेव्हा त्याच्या भावाने मृतदेह पाहिला, तेव्हा त्यांना धक्काच बसला. मृतदेहाच्या कानावर जखमांच्या खुणा होत्या. त्यानंतर त्यांनी लगेच पोलिसांना सांगितलं आणि संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली.

हे ही वाचा >> IND vs ENG, 5th Test: Test मॅच नाही जणू टी-20, मोहम्मद सिराजने 'असा' बदलला गेम अन् रचला इतिहास!

पोलीस तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले, तेव्हा त्यांना ही घटना सामान्य स्वरुपाची वाटली नाही. पोस्टमार्टम आणि प्राथमिक तपासात समोर आलं की, हा नैसर्गिक मृत्यू नाहीय. जेव्हा पोलिसांनी याप्रकरणाबाबत कुटुंबियांची कसून चौकशी केली, तेव्हा संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. तपासात समोर आलं आहे की, उत्तम गोगाईच्या पत्नीने आणि मुलीने हत्येचा त्याच्या हत्येचा प्लॅन केला होता. या हत्याप्रकरणात इतरही दोन तरुणांचा सहभाग होता.

हे वाचलं का?

    follow whatsapp