IND vs ENG, 5th Test: Test मॅच नाही जणू टी-20, मोहम्मद सिराजने 'असा' बदलला गेम अन् रचला इतिहास!
India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5व्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने अत्यंत रोमांचक असा विजय मिळवला. यासोबत भारताला मालिका ड्रॉ करण्यातही यश आलं.
ADVERTISEMENT

India vs England 5th Test: लंडनमधील ओव्हल क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5व्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने शानदार विजय नोंदवला. या विजयासह, 5 सामन्यांचा अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी 2025 मालिका 2-2 अशी ड्रॉ झाली आहे.
या सामन्यात भारताने इंग्लंड संघाला विजयासाठी 374 धावांचे लक्ष्य दिले होते. भारतीय संघाने पहिल्या डावात 224 धावा केल्या असताना, इंग्लंडचा पहिला डाव 247 धावांपर्यंत मर्यादित राहिला. म्हणजेच यजमान इंग्लंडला पहिल्या डावाच्या आधारे 23 धावांची थोडीशी आघाडी मिळाली होती. त्यानंतर, भारतीय संघाने दुसऱ्या डावात 396 धावा केल्या होत्या. त्यामुळे इंग्लंडला विजयासाठी 374 धावांची गरज होती.
पण शेवटच्या डावात इंग्लंडला तिथवर मजल मारता आली नाही आणि त्यांचा अवघ्या 6 धावांनी पराभव झाला.
टीम इंडियाने कसा फिरवला सामना?
या सामन्याचा निकाल चौथ्या दिवशीच येऊ शकला असता, परंतु चौथ्या दिवशी पावसामुळे तिसऱ्या सत्रात फक्त 10.2 षटके खेळता आली. पाऊस थांबला तोपर्यंत खूप उशीर झाला होता. अशा परिस्थितीत चौथ्या दिवसाचा खेळ संपवावा लागला. पाचव्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी 35 धावांची आवश्यकता होती, तर भारताला 4 विकेट्सची आवश्यकता होती.