कोकणात पावसाचा वेग मंदावला, 'या' भागात पावसाचा येलो अलर्ट जारी, आजचं वातावरण घ्या जाणून

Maharashtra Weather :  राज्यातील हवामान विभागाच्या (IMD) च्या अंदाजानुसार, राज्यात 6 ऑगस्ट 2025 रोजी हवामानात विशेषपूर्ण महत्त्वाचे बदल अपेक्षित असणार आहे.

Maharashtra Weather (फोटो सौजन्य: Grok AI)
Maharashtra Weather (फोटो सौजन्य: Grok AI)
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राज्यातील हवामान विभागाचा अंदाज

point

'या' भागात पावसाचा येलो अलर्ट जारी

Maharashtra Weather : राज्यातील हवामान विभागाच्या (IMD) च्या अंदाजानुसार, राज्यात 6 ऑगस्ट 2025 रोजी हवामानात विशेषपूर्ण महत्त्वाचे बदल अपेक्षित असणार आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मुसळधार पावसाची शक्यता जारी केली आहे. याशिवाय, विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. राज्यातील हवामानाचा सविस्तर अंदाज खालीलप्रमाणे दिला आहे. 

हे ही वाचा : पुतणीचाच जडला काकावर जीव, नंतर दोघांनीही केलं पळून जाऊन लग्न, नंतर कुटुंबीयांनी भररस्त्यातच...

कोकण :

कोकण भागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. मुंबईत ढगाळ वातावरण राहील, आणि काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. आर्द्रता जास्त राहण्याची शक्यता असल्याने उकाडा कायम राहील, परंतु पावसामुळे तापमान 32-33°C च्या आसपास राहील. कोकणातील सिंधुदुर्गात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

विदर्भ :

गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा आणि नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये 6 ऑगस्ट रोजी हवामान विभागाने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली. हवामान खात्याने या भागासाठी येलो अलर्ट जारी केला आहे. तापमान 32-34° सेल्सिअस राहील, परंतु ढगाळ वातावरणामुळे उकाडा जाणवेल. सायंकाळी आणि रात्री पावसाचा जोर वाढण्याची हवामान विभागाने शक्यता वर्तवली आहे. तर विजांच्या कडकडाटसह ताशी 30-40 किमी वेगाने वारे वाहण्याचा हवामान विभागाने इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गडचिरोली, गोंदिया, भंडारा येथे पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मराठवाडा :

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची हवामान विभागाने शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने नांदेड, लातूर आणि धाराशिव येथे हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. कारण या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि जोरदार वारे अपेक्षित आहेत. शेतकऱ्यांना पेरणी आणि पिकांच्या संरक्षणासाठी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. गडचिरोली, परभणी हिंगोली येथे पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.

हे ही वाचा : बुलढाण्यात खळबळ! प्रेमप्रकरणातून आरोपीने निष्पाप तरुणावर बुलढाण्यात दिवसाढवळ्या चाकूने केले सपासप वार, काय घडलं?

पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र :

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूरात येथे हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच पुण्यात ढगाळ वातावरणामुळे 30-31°C तापमानाची हवामान विभागाने शक्यता वर्तवली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे घाटमाथा आणि सातारा घाटमाथ्यावर पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

उत्तर महाराष्ट्र नाशिक आणि जळगाव येथे ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता आहे, तर तापमान 33-35°C राहील.

हे वाचलं का?

    follow whatsapp