'तुला जर माझ्याशी लग्न करायचं तर...' पतीचं बाहेर लफडं अन् पत्नीवर चाकूने 7 वेळा केले सपासप वार

extra marital affair : सोनम रघुवंशीसारखे अनेक प्रकरण या देशात घडताना दिसत आहेत. अनैतिक संबंधामुळे सात जन्म एकत्र राहण्याचं वचन देणाऱ्या जोडप्यांचे संसार मोडले गेले आहेत.

extra-marital affair
extra-marital affair
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सोनम रघुवंशीसारखेच प्रकरण

point

पतीने अनैतिक संबंधामुळे पत्नीचा केला खून

extra marital affair : सोनम रघुवंशी प्रकरणाची पुनरावृत्ती सातत्याने घडताना दिसत आहे. अनैतिक संबंधामुळे सात जन्म एकत्र राहण्याचं वचन देणाऱ्या जोडप्यांचे संसार मोडले जात आहेत. एवढंच नाही,तर काही निष्पाप पुरूषही त्याला बळी पडले गेले आहेत. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील बरेली येथे घडली आहे. या प्रकरणात पतीने पत्नीचा छळ करत तिची हत्या केली आहे. अवैध संबंधातून पतीने हे टोकाचं पाऊल उचलून आपल्या हातानेच स्वत: चा संसार मोडला आहे. आरोपी पतीचं नाव ओमसरन असे आहे.

हे ही वाचा : 'तुला आणि तुझ्या 4 महिन्यांच्या बाळाचा...', स्वस्तात मोबाईल देतो असं दुकानदाराने सांगितलं अन् कपड्यांच्या दुकानातच लुटली अब्रु

नेमकं काय घडलं? 

ओमसरन हा ब्युटी पार्लरमध्ये काम करणाऱ्या एका तरुणीच्या प्रेमात पडला होता. परिणामी त्याने स्वत:च्याच पत्नीच्या डोक्यावर चाकूने सपासप वार करत तिची हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमात पडलेल्या तरुणीनेच त्याला हत्येचा कट रचण्यास प्रवृत्त केले आहे. एकतर आपल्या पत्नीला सोडून द्यावं नाही,तर तिला आयुष्यातून दूर केलं जावं, असे त्याच्या प्रेयसीने सांगितलं. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 वर्षीय मन्नत उर्फ निधी ही बरेली जिल्ह्यातील बिहारीपूर वाल्मिकी वसाहतीतील रहिवासी आहे. ती एका ब्युटीपार्लरमध्ये काम करायची. ओमसरन लग्नांमध्ये सजावटीचे काम करायचा. दोघेही लग्नात भेटले आणि त्यानंतर ते एकमेकांना ओळखू लागले. नंतर त्यांची मैत्री झाली आणि नंतर प्रेमात रुपांतर झाले. पुढे पोलिसांनी सांगितलं की, तिचा पती हा दारू पितो आणि मारहाण करतो. परंतु, ती एका वर्षांपूर्वी तिच्या पतीपासून वेगळी झाली. तिसरे मूल अडीच वर्षांचे आहे आणि मन्नतसोबत राहते.

मन्नत आणि ओमसरन यांच्यातील जवळीकता आणखी वाढू लागली. दोघांनाही एकत्र राहण्यासाठी त्यांनी एक खोली भाडेतत्वावर घेतली. मन्नतने सांगितलं की, ते 6-7 महिने रिलेशनशिपमध्ये होते. या काळात ओसमरन घरी यायचा, पण दोघांनीही लग्न केले नव्हते. जेव्हा तिला कळले की, ओमसरन विवाहित आहे, तेव्हा त्याने एक अट घातली की, जर तुला माझ्यासोबत राहायचे असल्याच पत्नीला सोडावं लागेल.

हे ही वाचा : मंगळ ग्रहाने राशी बदलली 'या' राशीच्या लोकांना होणार धनाचा लाभ, जाणून घ्या तुमच्या राशीत काय लिहिलं?

ओमसरन आपली पत्नी मन्नतला सतत टाळायचा, अशा परिस्थितीत मन्नत भयभीत झाली. ओमसरनवर तिच्या प्रेयसीने पत्नीला काहीही करून सोडून देण्यास दबाव आणण्यास सुरूवात केली. 30 जुलैच्या मध्यरात्री, त्याने त्याच्या पत्नीला एका निर्जनस्थळी नेले आणि तिच्या डोक्यावर चाकूने सपासप वार केले. संबंधित प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच, आरोपी ओमसरला बेड्या ठोकल्या आहेत. 

संबंधित घटनेचे प्रश्नोत्तर

प्रश्न : ही घटना कुठे घडली? 

ही घटना उत्तर प्रदेशातील बरेली येथे घडली

प्रश्न : पतीने पत्नीचा खून करण्यामागे काय हेतू होता? 

पतीचेच विवाहबाह्य संबंध असल्याने पत्नीचा खून केला,

हे वाचलं का?

    follow whatsapp