अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचं मुंडकंच छाटलं अन्... नंतर न्यूज चॅनलला सांगितली भलतीच गोष्ट
तामिळनाडूच्या तूतीकोरिन जिल्ह्यातील एका सीआरपीएफ कॉन्स्टेबलने आपल्याच पत्नीची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. थलावैपुरम गावाचा रहिवासी असलेल्या आरोपी पतीने अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा शिरच्छेद केल्याचं सांगण्यात येत आहे.

बातम्या हायलाइट

अनैतिक संबंधाच्या संशयातून केली पत्नीची हत्या

शिरच्छेद केला आणि न्यूज चॅनलला सांगितली 'ती' गोष्ट
Crime News: तामिळनाडूच्या तूतीकोरिन जिल्ह्यातील एका सीआरपीएफ कॉन्स्टेबलने आपल्याच पत्नीची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. थलावैपुरम गावाचा रहिवासी असलेल्या आरोपी पतीने अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा शिरच्छेद केल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर आरोपी हत्येबाबत माहिती सांगण्यासाठी एका न्यूज चॅनलमध्ये गेला आणि तिथे संबंधित वृत्तवाहिनीच्या कर्मचाऱ्यांनी ताबडतोब या हत्येबद्दल पोलिसांना कळवले. त्यानंतर तेयनामपेट पोलिसांनी नुंगमबक्कम हाय रोडजवळ आरोपीला अटक केली. तसेच, त्याला पुढील तपासासाठी तुतीकोरिन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती आहे.
पत्नीचा केला शिरच्छेद
'इंडिया टूडे'च्या वृत्तानुसार, प्रकरणातील आरोपीचं नाव तमिल सेल्वन असून तो एक सीआरपीएफ जवान म्हणून कार्यरत होता. 31 जुलै रोजी त्याने थलवाईपुरम परिसरातील आपल्या घरात 32 वर्षीय पत्नीची अनैतिक संबंधाच्या संशयातून निर्घृणपणे हत्या केली. पीडितेचं नाव उमा माहेश्वरी असल्याचं समोर आलं आहे. आरोपीने आपल्या पत्नीचं डोकं धडापासून वेगळं करत तिची हत्या केली. पत्नीच्या हत्येनंतर आरोपी पती त्याच्या 9 वर्षांचा मुलगा आणि 7 वर्षांच्या मुलीला घेऊन त्याच्या सासरच्या घरी पळून गेला.
हे ही वाचा: भर बाजारात झाडल्या गोळ्या अन्... 15 वर्षीय प्रेयसीसोबत तरुणाने 'असं' का केलं?
टीव्ही चॅनलशी संपर्क साधला अन्...
या भयंकर घटनेच्या काही दिवसांनंतर, तमिल सेल्वनने एका टीव्ही चॅनेलशी संपर्क साधला आणि त्याच्या या गुन्ह्याबद्दल सार्वजनिकपणे बोलण्याची इच्छा व्यक्त केली. आरोपीच्या या विनंतीने चॅनेलच्या कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आणि त्यांनी तेयनामपेटचे सहाय्यक पोलिस आयुक्त अरोकिया रवींद्रन यांना या गुन्ह्याची माहिती दिली. त्वरीत पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपीला अटक केली.
हे ही वाचा: 6 महिन्यात 7 वेळा शिक्षण विभाग तोंडघशी कसा पडलाय, शिक्षण विभागात खेळखंडोबा का?
पोलिसांनी दिली माहिती
पोलिसांचं पथक चेन्नईला पोहचलं असून लवकरच न्यायाधीशांकडून ट्रान्झिट वॉरेन्ट हाती घेणार असल्याची माहिती तूतीकोरिनचे एसपी अल्बर्ट जॉन यांनी प्रकरणाची माहिती देताना सांगितलं. तसेच, आरोपी पतीला बऱ्याच काळापासून त्याच्या पत्नीवर अनैतिक संबंध सुरू असल्याचा संशय होता. पीडितेवर सतत नजर ठेवण्यासाठी आरोपी पतीने त्याच्या घरात आत आणि बाहेरसुद्धा कॅमेरे लावले होते. संबंधित प्रकरणाचा तपास सुरू असल्याची पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती दिली.