चारवेळा बाशिंग बांधलं..पण तरुणाचं एकदाही हनिमून झालं नाही! चौघीही गेल्या पळून, पहिल्या रात्री काय घडायचं?
Today Shocking Viral News : राजस्थानच्या जोधपूरमध्ये एका तरुणाचं चारवेळा लग्न झालं होतं. पण एकही नवरी त्याच्यासोबत आली नाही.

बातम्या हायलाइट

तरुणाने चारवेळा लग्न केलं, पण चारही तरुणी पळून गेल्या..

त्या लग्नावेळी नवरीसोबत पंडीतही पळाला

त्या गावात नेमकं काय घडलं होतं?
Today Shocking Viral News : राजस्थानच्या जोधपूरमध्ये एका तरुणाचं चारवेळा लग्न झालं होतं. पण एकही नवरी त्याच्यासोबत आली नाही. हे धक्कादायक प्रकरण जोधपूर जिल्ह्यातील लूणी पोलीस स्टेशनच्या परिसरातील आहे. येथील विजेंद्र नावाच्या तरुणाचं लग्न होत नव्हतं. त्यामुळे शेजाऱ्यांनी त्याला मदत करायचं ठरवलं. शेजाऱ्यांनी त्याला सांगितलं, जर त्यांना पैसे दिले तर ते त्याचं लग्न जुळवतील. विजेंद्रने त्यांचं ऐकलं. पण विजेंद्र जराही कल्पना नव्हती की, चारवेळा लग्न करूनही त्याच्यासोबत नवरी येणार नाही. आता विजेंद्रने थेट पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत न्यायाची मागणी केली आहे.
त्या गावात नेमकं काय घडलं होतं?
विजेंद्रला लग्नाच्या टेन्शनमुळे एकटेपणा जाणवत होता. त्याने शेजऱ्यांवर विश्वास ठेवला. शेजाऱ्यांनी त्याचं चारवेळा लग्न केलं. पण एकही नवरी त्याच्यासोबत घरी आली नाही. तरुणाच्या पहिल्या लग्नासाठी मंडप सजलं, बँडबाजा वाजवून लग्न लागलं. त्यानंतर नवरी बसमधून खाली उतरून पळून गेली. शेजारच्या लोकांनी त्याला सांगितलं की, ते पुढच्या वेळी त्याला चांगली मुलगी शोधतील.
हे ही वाचा >> काय सांगता! महागलेलं सोनं पुन्हा झालं स्वस्त.. श्रावण महिन्याचा शेवट झाला गोड, आजचे दर वाचून खुश व्हाल
त्यानंतर तरुणाने त्यांचं म्हणणं ऐकलं. त्यानंतर काही वेळानंतर तरुणाच्या दुसऱ्या लग्नाची तयारी झाली. लग्न पार पडल्यानंतर नवरी ट्रेनमध्ये बसली आणि फरार झाली. यावेळी तरुणाला धोका मिळाला. विजेंद्र आता तिसऱ्यांदा लग्नाची तयारी करत होता. यावेळी त्याला विश्वास होता की, त्याच्या नशिबात कोणीतरी मुलगी येईल.
नवरीसोबत पंडीतही पळाला
यावेळी तर हद्दच झाली. तरुणाच्या लग्नाची जोरदार तयारी झाली होती. पण नवरी फरार झाली. इतकच नव्हे, तर लग्नाचे मंगलाष्टके वाचणारा पंडितही पळून गेला. त्यानंतर शेजारच्यांनी त्याला चौथ्या लग्नाचंही स्वप्न दाखवलं. त्याला वाटलं यावेळी काहीतरी चांगलं होईल. चौथ्यांदा मुलगी आली. तरुणाचं लग्न झालं.
हे ही वाचा >> धावत्या लोकलमधून चोरट्याने मोबाईल हिसकावला, प्रवाशाचा गेला तोल अन् पाय चिरडले, नेमकं ठाण्यात काय घडलं?
पण वरातीच्या वेळी नवरीने पलटी मारली आणि ती सुद्धा पळून गेली. त्यानंतर तरुणाला समजलं की, लग्नाचा बहाणा करून शेजारी त्याची लुटमार करत आहेत. तरुणाने या चारही लग्नांसाठी 3 लाख 85 हजार रुपये खर्च केले. त्यानंतर विजेंद्रने त्याचे शेजारी, पप्पू भारती, अमर भारती आणि भंवरी देली आणि राकेश भारती यांच्याकडे पैसे परत मागितले. त्यानंतर त्याने आरोपींविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.