काय सांगता! महागलेलं सोनं पुन्हा झालं स्वस्त.. श्रावण महिन्याचा शेवट झाला गोड, आजचे दर वाचून खुश व्हाल
Today Gold Rate : देशात सोन्याच्या किंमतीत गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज सोमवारी 4 ऑगस्ट 2025 रोजी सोन्याच्या किंमतीत घट झाल्याचं समोर आलंय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली घट?
22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?
मुंबईत आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?
Today Gold Rate : देशात सोन्याच्या किंमतीत गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज सोमवारी 4 ऑगस्ट 2025 रोजी सोन्याच्या किंमतीत घट झाल्याचं समोर आलंय. आता तुम्ही श्रावण महिन्याच्या शुभ मुहूर्तावर सोनं-चांदी खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल, तर ही सुवर्ण संधी आहे.
मागील आठवड्याच्या तुलनेत 10 ग्रॅम सोन्याचे दर 100 रुपयांनी कमी झाले आहेत. आज राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 99900 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅंमची किंमत 91400 रुपयांवर पोहोचली आहे. तसच चांदीचे प्रति किलोग्रॅमचे भाव 112900 रुपयांवर पोहोचले आहेत. अशातच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर काय आहेत, याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर
मुंबई
मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 101400 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 92950 रुपये झाली आहे.
पुणे
पुण्यात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 101400 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 92950 रुपये झाली आहे.










