"मी तिचा पहिला रुग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर..." इंजिनिअरने 'ती' शेवटची चिठ्ठी अन् हॉटेलमध्येच...

मुंबई तक

उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यात एका अभियंत्याने हॉटेलच्या खोलीत गळफास घेऊन स्वत:चं आयुष्य संपवल्याची बातमी समोर आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने पेन ड्राइव्हमध्ये एक सुसाईड नोट देखील लिहिली आहे.

ADVERTISEMENT

अभियंत्याने लिहिली 'ती' कहाणी अन् हॉटेलमध्येच संपवलं आयुष्य...
अभियंत्याने लिहिली 'ती' कहाणी अन् हॉटेलमध्येच संपवलं आयुष्य...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अभियंत्याने हॉटेलमध्ये स्वत:ला संपवलं

point

पेन ड्रायव्हमध्ये सापडली सुसाइड नोट अन्...

point

कोणाला दिला दोष?

Crime News: उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यात एका अभियंत्याने हॉटेलच्या खोलीत गळफास घेऊन स्वत:चं आयुष्य संपवल्याची बातमी समोर आली आहे. पीडित तरुणाचं नाव रोहीत असून तो मेरठचा रहिवासी असल्याचं सांगितलं जात आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने पेन ड्राइव्हमध्ये एक सुसाईड नोट देखील लिहिली आहे. हे प्रकरण पचकुइया (लोहामंडी) परिसरातील खूबसूरत हॉटेलमधील असल्याचं समोर आलं आहे. 

पंख्याला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह 

रविवारी (3 ऑगस्ट) ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. घटनेच्या दुसऱ्या दिवशी हॉटेल कर्मचाऱ्यांना संशय आल्यानंतर त्यांनी खोलीचा दरवाजा ठोठावला. पण खोलीच्या आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर याबाबत पोलिसांना कळवण्यात आले आणि तातडीने पोलीस घटनास्थळी पोहोचले. खोलीचा दरवाजा तोडण्यात आला आणि आत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत इंजिनिअरचा मृतदेह आढळला. हे दृश्य पाहून सर्वांना मोठा धक्का बसला. मृतदेह ताबडतोब फासावरून खाली उतरवण्यात आला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. पोलिसांना मृतदेहाजवळ पेन ड्राइव्ह सापडला आणि पुरावा म्हणून तो ताब्यात घेण्यात आला. 

पेन ड्रायव्हमध्ये काय आढळलं? 

पेन ड्राइव्हची तपासणी केली असता त्यात बऱ्याच विचित्र गोष्टी आढळल्या. त्यातील एका पीडीएफ फाइलमध्ये एक सुसाईड नोट देखील सापडली. पोलिसांनी पीडित तरुणाच्या वडिलांना फोन केला असता संबंधित तरुणाने गाझियाबादमधून इंजिनीअरिंग पूर्ण केलं असून तो अविवाहित असल्याचं समजलं. तसेच, त्याच्या आईचे सुमारे दोन वर्षांपूर्वी निधन झाले होते आणि घरात फक्त तो आणि त्याचा मुलगा राहत असल्याची माहिती मिळाली. याशिवाय त्याचा मोठा मुलगा आयआयटी मुंबईमधून शिक्षण घेत असून तो एक सायन्टिस्ट असल्याचं वडिलांनी सांगितलं. 

हे ही वाचा: आधीच 7 लग्न अन् आठव्या नवरीला घरी आणलं, पण हनीमूनच्या दुसऱ्या दिवशीच केली 'ती' चूक! नंतर पोलीस सुद्धा...

"मला कोणताही ड्रामा नकोय..."

एसीपी लोहा मंडी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहितच्या सुसाईड नोटमधून आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कारण त्याने स्वत:ला संपवण्यामागे कोणालाही दोष दिलेला नाही.  सुसाईड नोटमधील इच्छा यादीच्या कॉलममध्ये मोहितचा नंबर आणि दोन मोबाईल नंबर लिहिलेले असल्याचं आढळून आलं. दोन्ही नंबर परदेशी असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच, नोटमध्ये त्याने लिहिले आहे की "काहीही करण्याची गरज नाही. मी जसा गायब आहे तसाच राहू द्या. मला कोणताही ड्रामा नकोय. 13 दिवसांचा ड्रामा करण्याची काहीच गरज नाही. तसेच, नातेवाईकांना काहीही सांगण्याची गरज नाही." 

हे वाचलं का?

    follow whatsapp