2 महिन्यापूर्वी खाली पडलेलं पिंपळाचं झाडं रातोरात उभं राहिलं..पूजा करण्यासाठी भाविकांची गर्दी उसळली अन्..
Peepal Tree Viral News : मोतिहारी जिल्ह्यातील हरसिद्धी प्रखंड परिसरात असणाऱ्या बैरिया ग्रामपंयातीत माई भागात एक आगळीवेगळी घटना घडली. या घटनेमुळं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

बातम्या हायलाइट

त्या गावात पिंपळाच्या झाडाची पूजा का करतात?

लांबचा प्रवास करून भाविक पूजेसाठी गर्दी करतात अन्

काय आहे या घटनेमागचं सत्य?
Peepal Tree Viral News : मोतिहारी जिल्ह्यातील हरसिद्धी प्रखंड परिसरात असणाऱ्या बैरिया ग्रामपंयातीत माई भागात एक आगळीवेगळी घटना घडली. या घटनेमुळं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. येथे दोन महिन्यांआधी पडलेलं पिंपळाचं विशाल झाड रविवारी रात्री अचानक उभं राहिलं. स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की, हे एखाद्या चमत्काराशिवाय कमी नाही. तर काही लोक हे अंधश्रद्धा अशल्याचं म्हणत आहेत. मुंबई तक या माहितीची पुष्टी करत नाही. या घटनेनंतर परिसरात मोठ्या संख्येत लोकांनी गर्दी केली. खासकरून महिलांनी या झाडाची मनोभावे पूजा केली. श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी ही घटना घडल्याने लोकांमध्ये धार्मिक आस्था वाढली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास दोन महिन्यांपूर्वी माई स्थान परिसरात एक पिंपळाचं विशाल झाड खाली कोसळलं होतं. एका व्यापाऱ्याने या झाडाच्या फांद्या तोडून लाकडं बनवली होती. पण मुख्य खोड तसच होतं.
रविवारच्या रात्री जेव्हा पाऊस सुरु होता, त्यावेळी काही लोक पूजा करण्यासाठी मंदिरात पोहोचले. तेव्हा त्यांनी पाहिलं की, पिंपळाचं झाड पुन्हा उभं राहिलं आहे.
हे ही वाचा >> IND vs ENG, 5th Test: Test मॅच नाही जणू टी-20, मोहम्मद सिराजने 'असा' बदलला गेम अन् रचला इतिहास!
स्थानिक लोकांनी काय म्हटलं?
स्थानिक रहिवासी बीरेंद्र कुशवाहा आणि सुभाष सिंह कुशवाने म्हटलं की, हे झाड खूप मोठं होतं आणि दोन महिन्यांपासून जमिनीवर पडलं होतं. अचानक हे झाड उभं राहिलं. हे कोणती सामान्य गोष्ट नाहीय. हे माई स्थानची कृपा आणि श्रावण महिन्याचा प्रभाव आहे. ही लोकांचं म्हणणं आहे की, हे झाड भोलेनाथ आणि माता देवीचं प्रतिक आहे.
व्हिडीओ व्हायरल, दूर दूरचे लोक पूजा करतायत
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झाला आहे. लोक लांबचा प्रवास करून हा चमत्कार पाहायला येत आहेत. तसंच काही लोक या झाडाची पूजाही करत आहेत. माई परिसरातील चारही बाजूला भाविकांची गर्दी होत आहे. भाविक भजन-किर्तन आणि पूजा करत आहेत. दरम्यान, प्रशासनाकडून या घटनेबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आली नाहीय. ही घटना धार्मिक आस्था, अंधश्रद्धा यांचं मिश्रण असल्याचं म्हटलं जात आहे. तर काही लोक हे देवी देवतांच्या कृपेनं घडल्याचं म्हणत आहेत.