उत्तरकाशी: उत्तराखंडमधील उत्तरकाशीतील हरसिल येथील भारतीय लष्करी छावणीपासून सुमारे 4 किमी अंतरावर असलेल्या धारली गावात मंगळवारी दुपारी 1.45 च्या सुमारास ढगफुटीनंतर प्रचंड हाहाकार माजला. ढगफुटीनंतर आलेल्या भीषण पुरात मोठी जीवितहानी झाली आहे. पण अद्याप अधिकृत आकडा समोर आलेला नाही. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एकूण 50 हून अधिक लोक बेपत्ता असल्याचं समजतं आहे.
ADVERTISEMENT
या पुरामुळे पवित्र गंगोत्री धामशी जोडलेला सर्व रस्त्यांशी संपर्क तुटला आहे. या आपत्तीमुळे पाणी आणि ढिगाऱ्यांचा इतका पूर आला की संपूर्ण परिसर पाण्याखाली गेला. ज्यानंतर अनेक एजन्सींना आपत्कालीन मदतीसाठी पाठवण्यात आले आहे.
एका प्रत्यक्षदर्शीने इंडिया टुडे टीव्हीला सांगितले की, "हॉटेलपासून बाजारपेठेपर्यंत सर्व काही उद्ध्वस्त झाले आहे. मी यापूर्वी कधीही अशी आपत्ती पाहिली नाही."
हरी शिला पर्वताच्या सात ताल परिसरातून खीर गंगा वाहते, तिथेच ही ढगफुटी झाली आहे. उजवीकडे धाराली परिसर आहे, तर डावीकडे हर्षिलच्या तेल घाट येथे आर्मी कॅम्प आहे. या अपघाताच्या वेळी स्थानिक आणि पर्यटकांसह 200 हून अधिक लोक धारली येथे उपस्थित होते.
10 लष्करी सैनिक बेपत्ता...
दरम्यान, या नैसर्गिक आपत्तीमध्ये जवळच असणारं आर्मी कॅम्प देखील उद्ध्वस्त झालं आहे. येथे आर्मी मेस आणि कॅफे आहे. या अपघातात अनेक सैनिक बेपत्ता झाल्यची भीती व्यक्त केली जात आहे. आर्मीच्या 14 राजरीफ युनिट्स हरसिलमध्ये तैनात आहेत. याशिवाय, उत्तरकाशीपासून 18 किमी अंतरावर असलेल्या नेटला येथे झालेल्या भूस्खलनामुळे धारली येथे पोहोचता येत नाहीए.
धाराली अपघातात 10 लष्करी सैनिक आणि एक जेसीओ बेपत्ता असल्याची माहिती आहे. त्याच वेळी, एक अधिकारी जखमी झाला आहे. आर्मी कॅम्प नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित झाला आहे. असे असूनही, लष्कराच्या 14 राजरीफ युनिटचे कमांडिंग ऑफिसर आणि सैनिक मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत.
हेलिपॅडही गेलं वाहून...
हरसिलमधील नदीकाठावर बांधलेला हेलिपॅडही वाहून गेला आहे. मुसळधार पावसामुळे हेलिकॉप्टरने बचाव आणि मदतकार्य शक्य नाही. हरसिल परिसरातील खिरगढ नाला ओसंडून वाहत असल्याने विध्वंस आणखी वाढला आहे. ज्यामुळे उत्तरकाशी पोलीस, एसडीआरएफ, एनडीआरएफ, लष्कर आणि इतर बचाव पथकांना सर्वाधिक प्रभावित भागात मदत कार्य सुरू करावे लागले. भूस्खलन झालेल्या ठिकाणाजवळ तैनात असलेल्या भारतीय लष्कराने पहिल्या बचाव कार्यकर्त्यांमध्ये सुमारे 15 जणांना वाचवले.
ADVERTISEMENT
