नांदेड: आंतरजातीय प्रेमसंबंधातून प्रियकराची हत्या, प्रेयसीने मृतदेहासोबतच केलं लग्न! हळद लावून सिंदूर भरलं अन्...

मुंबई तक

• 05:16 PM • 29 Nov 2025

प्रेयसीच्या वडिलांसह तिच्या भावांनी मिळून तरुणाची हत्या केल्याचं वृत्त आहे. मृत तरुणाच्या प्रेयसीने अंत्यसंस्कारापूर्वी स्वत:ला हळद लावली आणि कपाळावर कुंकू तसेच सिंदूर भरून प्रियकराच्या मृतदेहासोबत लग्न केल्याचं सांगितलं जात आहे.

प्रेयसीने मृतदेहासोबतच केलं लग्न!

प्रेयसीने मृतदेहासोबतच केलं लग्न!

Google CTA

बातम्या हायलाइट

point

आंतरजातीय प्रेमसंबंधातून प्रियकराची हत्या

point

प्रेयसीने मृतदेहासोबतच केलं लग्न!

Nanded Crime: नांदेडमध्ये आंतरजातीय प्रेमसंबंधातून एक हृदयद्रावक घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. प्रेयसीच्या वडिलांसह तिच्या भावांनी मिळून तरुणाची हत्या केल्याचं वृत्त आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे, मृत तरुणाच्या प्रेयसीने अंत्यसंस्कारापूर्वी स्वत:ला हळद लावली आणि कपाळावर कुंकू तसेच सिंदूर भरून प्रियकराच्या मृतदेहासोबत लग्न केल्याचं सांगितलं जात आहे. नेमकी घटना काय? सविस्तर जाणून घ्या. 

हे वाचलं का?

तरुणीच्या कुटुंबियांकडून प्रियकराची हत्या 

नांदेडमधील जुना गंज परिसरात गुरुवारी (27 नोव्हेंबर) संध्याकाळच्या सुमारास दुसऱ्या जातीतील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्यामुळे तरुणीच्या घरच्यांनी तिच्या प्रियकराची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. प्रकरणातील मृत तरुणाचं नाव सक्षण ताटे असून त्याच्या प्रेयसीच्या वडिलांनी, भावांनी आणि मित्रांनी मिळून त्याला आधी गोळी झाडली आणि नंतर फरशीने डोक्यात वार करून त्याची अतिशय निर्घृणपणे हत्या केली. 

आंतरजातीय प्रेमसंबंधाला घरच्यांचा विरोध 

पीडित सक्षमचे आचल नावाच्या तरुणीसोबत गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. सक्षम हा आचलच्या भावाचा मित्र असून तो सतत त्याच्या घरी येत-जात होता. दरम्यान, आचल आणि सक्षमचं एकमेकांवर प्रेम जडलं. परंतु, एके दिवशी आचलच्या भावाला आपल्या बहिणीच्या प्रेमसंबंधांबद्दल कळालं. खरं कर, सक्षम हा दुसऱ्या जातीचा असल्यामुळे तिच्या कुटुंबियांचा या नात्याला विरोध होता. आचलच्या भावाने सक्षमला बहिणीशी बोलू नको, अशी ताकीद सुद्धा दिली होती. पण, गुरुवारी संध्याकाळी तरुणीचे वडील, भाऊ आणि त्यांच्या इतर साथीदारांनी मिळून सक्षमला बेदम मारहाण केली. त्यावेळी, तरुणावर गोळी झाडून आणि डोक्यावर फरशीने वार करून निर्घृण हत्या केली. 

हे ही वाचा: मुंबई: आता इमारतींच्या गच्चीवर होर्डिंग लावण्यास बंदी! काय आहे मुंबई महापालिकेचे नवे जाहिरात धोरण?

दरम्यान, या घटनेबाबत मुलाची हत्या केल्याप्रकरणी सक्षमच्या आईने आचलचे आई-वडील, दोन भाऊ आणि इतर चौघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. तसेच, अॅट्रॉसिटीचा देखील गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी बारा तासांत घटनेतील आरोपींना अटक केल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, आरोपी आणि मृत तरुणाची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती आहे. 

हे ही वाचा: सफाई कामगारांना मासिक पाळीचे फोटोसह पुरावे मागितले, सुप्रीम कोर्टाने व्यक्त केला संताप, केंद्र सरकारला नोटीस

आई-वडिलांना फाशी देण्याची तरुणीची मागणी 

दरम्यान, सक्षमच्या हत्येनंतर आचल त्याच्या घरी पोहोचली आणि त्याच्या अंत्यसंस्कार होण्यापूर्वी तिने त्याच्या मृतदेहासह स्वत:ला हळद लावली आणि कपाळावर कुंकू तसेच सिंदूर भरलं. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला. इतकेच नव्हे तर आचलने आपल्या आई-वडील आणि भावांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी देखील केली आहे. ती म्हणाली की, माझ्या घरच्यांनी माझ्या प्रियकराला मारलं. तरीसुद्धा तो मरून जिंकला आहे आणि माझे वडील, भाऊ हरले आहेत." आता, या प्रकरणातील आरोपींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली जात असून पोलीस घटनेचा तपास करत असल्याची माहिती आहे.