Govt Job: महाराष्ट्र Metro मध्ये नोकरीची मोठी संधी; पगार तर लाखोंच्या घरात...

महाराष्ट्र मेट्रोकडून 151 रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. जाणून घ्या, पात्रता आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख.

महाराष्ट्र Metro मध्ये नोकरीची मोठी संधी

महाराष्ट्र Metro मध्ये नोकरीची मोठी संधी

मुंबई तक

• 02:47 PM • 07 Jun 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्र मेट्रोकडून नोकरीची संधी

point

MAHA Metro मध्ये 151 पदांसाठी भरती

point

काय आहे अर्जाची प्रक्रिया आणि पात्रता?

Govt Job: महाराष्ट्र मेट्रो म्हणजेच Maharashtra Metro Rail(MAHA Metro) कडून 2025 मधील कडून विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती जूनियर इंजीनियरच्या 151 रिक्त पदांसाठी घेतली जाणार आहे. या भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया 5 जूनपासून सुरू झाली असून उमेदवार 4 जुलैपर्यंत अर्ज करू शकतात. यासाठी उमेदवार mahametro.org या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. 

हे वाचलं का?

शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे पदानुसार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापिठातून बी.आर्क (B.Arch)/बी.टेक (B.Tech)/ बीई (B.E) /सीए (C.A)/आईसीडब्ल्यूए (ICWA) ची डिग्री असणं आवश्यक आहे. 

वेतन

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 40 हजार रुपये ते 2 लाख 80 हजार रुपयांपर्यंत वेतन दिले जाईल. 

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी कमाल 55 वर्षे वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे. तसेच, आरक्षित प्रवर्गाच्या नियमांनुसार, OBC (ओबीसी) प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षांपर्यंत आणि SC (एससी) आणि ST (एसटी) प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत 5 वर्षांपर्यंत सूट देण्यात आली आहे. 

हे ही वाचा: Mumbai: धावत्या ट्रेनमध्ये चोरी, पत्नीच्या पर्ससाठी पतीची उडी, पण चाकाखाली...

अर्जाचे शुल्क

अर्ज करण्यासाठी जनरल (Open) आणि ओबीसी (OBC) प्रवर्गातील उमेदवारांना 400 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तसेच, एससी (SC), एसटी (ST) प्रवर्गातील उमेदवारांना आणि महिलांना अर्जाची प्रक्रिया निशुल्क असणार आहे. 

निवड प्रक्रिया

मुलाखत, डॉक्यूमेंट्स व्हेरिफिकेशन आणि मेडिकल टेस्ट अशा तीन टप्प्यांमधून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. 

हे ही वाचा: महिलेला भुलीचं इंजेक्शन देत रात्रभर हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी केलं लैंगिक शोषण, पतीला कळताच...

ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया

1. सर्वप्रथम mahametro.org या अधिकृत वेबसाइटवर जा. 

2. त्यानंतर 'Apply' बटणावर क्लिक करा. 

3. रजिस्ट्रेशन करून लॉगिन करा.

4. आवश्यक डॉक्यूमेंट्स अपलोड करुन अर्जाचे शुल्क भरा. 

5. यानंतर फॉर्म सबमिट करुन त्याची प्रिंटआउट काढून घ्या. 

या भरतीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवार MAHA Metro च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. 

    follow whatsapp