Govt Jobs : डिप्लोमा इंजिनिअरिंग उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची संधी, 668 जागांची होणार भरती; लगेच करा अर्ज

मुंबई तक

• 11:23 AM • 19 Apr 2026

भारत सरकारच्या 'पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड' (PGCIL) मार्फत विविध पदांच्या एकूण 668 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Government Jobs

Government Jobs

Google CTA

बातम्या हायलाइट

point

डिप्लोमा इंजिनिअरिंग उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची संधी

point

668 जागांची होणार भरती

point

लगेच करा अर्ज

Government Jobs : डिप्लोमा इंजिनिअरिंग उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची एक उत्तम संधी चालून आली आहे. भारत सरकारच्या 'पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड' (PGCIL) मार्फत विविध पदांच्या एकूण 668 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने डिप्लोमा ट्रेनी, ज्युनियर ऑफिसर ट्रेनी आणि ज्युनियर टेक्निशियन ट्रेनी या पदांचा समावेश आहे. सर्वाधिक 479 जागा या इलेक्ट्रिकल डिप्लोमा ट्रेनीसाठी असून, सिव्हिल आणि सर्व्हे विभागातील डिप्लोमा उत्तीर्ण असलेल्यांना देखील उत्तम संधी उपलब्ध आहे.

हे वाचलं का?

पात्रतेचे निकष

पात्रतेच्या निकषांनुसार, तांत्रिक पदांसाठी संबंधित विषयात 70 टक्के गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा असणे आवश्यक आहे. काही पदांसाठी बीबीए किंवा तत्सम पदवी, तर काही पदांसाठी 'इंटर सीए' उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. आयटीआय (सर्वेअर) उमेदवारांसाठी देखील ज्युनियर टेक्निशियनच्या जागा राखीव आहेत. अनुसूचित जाती, जमाती आणि दिव्यांग उमेदवारांना गुणांच्या अटीमध्ये सवलत देण्यात आली असून, त्यांना केवळ उत्तीर्ण श्रेणीवर अर्ज करता येईल. या पदांसाठी संपूर्ण भारतात कुठेही नियुक्ती मिळू शकते, ज्यामुळे उमेदवारांना मोठ्या स्तरावर अनुभव घेता येईल.

हे ही वाचा : PM Modi: 'त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा मिळेल...', PM मोदींना राग अनावर, काँग्रेसवर भडकले!

अर्ज प्रक्रिया

वयोमर्यादेचा विचार केल्यास, 11 मे 2026 रोजी उमेदवाराचे वय 27 वर्षांपर्यंत असावे. नियमानुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत देण्यात आली आहे, ज्यामध्ये अनुसूचित जाती व जमातीसाठी 5 वर्षे तर ओबीसी प्रवर्गासाठी 3 वर्षांची सवलत लागू असेल. अर्जासाठी खुल्या आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 300 रुपये शुल्क भरावे लागेल. विशेष म्हणजे अनुसूचित जाती, जमाती, दिव्यांग आणि माजी सैनिकांसाठी कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.

हे ही वाचा : अक्षय्य तृतीयेला घरी आणा 'ही' वस्तू, कुटुंबाची होईल भरभराट, कधीच कमी पडणार नाही पैसा..

रोजगाराचे उत्तम व्यासपीठ

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ही संधी गमावू नये, कारण पॉवर ग्रिडसारख्या नामांकित सरकारी संस्थेत करिअर करण्याची ही मोठी संधी आहे. 11 मे 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्जाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला  (www.powergrid.in) भेट देऊन विहित मुदतीत आपले अर्ज सादर करावेत. कागदपत्रांची पूर्तता आणि पात्रता निकष तपासून घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तांत्रिक शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी रोजगाराचे हे एक उत्तम व्यासपीठ ठरणार आहे.