Shiva Jaiswal injured in Delhi Car blast : दिल्लीमध्ये सोमवारी झालेल्या स्फोटात अनेक लोकांचा मृत्यू झाला असून, काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींमध्ये उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील रहिवासी शिवा जयस्वाल यांचाही समावेश आहे. बाजारात रेडीमेड कपड्यांचे दुकान चालवणारे शिवा जखमी झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबाला काल रात्री टीव्हीवरील बातम्यांमधून मिळाली. बातमी समजताच त्यांच्या कुटुंबीयांनी तातडीने दिल्लीकडे प्रयाण केले.
ADVERTISEMENT
एकुलता एक भाऊ जखमी झाल्याने कुटुंब हादरले
शिवा जयस्वाल जखमी झाल्याच्या बातमी मिळाल्यानंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शिवा हे घरातील एकुलतेच पुत्र असून त्यांच्या चार बहिणींचे लग्न झालेले आहे. वडील आता हयात नाहीत आणि आई माया जयस्वाल कॅन्सरग्रस्त आहेत. त्या भाजपच्या स्थानिक नेत्या देखील आहेत.
शिवाच्या बहीण रंजन जायसवाल यांनी सांगितले की, भाऊ 9 नोव्हेंबरच्या रात्री व्यवसायाच्या कामानिमित्त बसने दिल्लीला गेले होते. त्यांच्या जखमी झाल्याची माहिती कुटुंबाला टीव्हीद्वारे मिळाली. शिवाची रेडीमेड कपड्यांचं दुकान आहे आणि नवीन कपड्यांचा माल खरेदी करण्यासाठी ते दिल्लीला गेले होते.
हेही वाचा : 'दिल्ली Bomb Blast'शी 'या' 4 डॉक्टरांचं कनेक्शन! दहशतवादी संघटनांशी संबंध, घातक रसायने अन् विस्फोटके...
आई कॅन्सरग्रस्त, बहिणी दिल्लीकडे रवाना
रंजन जायसवाल यांनी सांगितले की, स्फोट त्या वेळी झाला जेव्हा शिवा बाजारात खरेदी करत होते. त्यांच्या एका बहिणीचे वास्तव्य दिल्लीमध्येच आहे. बातमी कळताच संपूर्ण कुटुंब चिंतेत पडले आणि नातेवाईक तात्काळ दिल्लीकडे रवाना झाले. सध्या शिवा रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना कुटुंबासाठी दुहेरी संकट घेऊन आली आहे, कारण आधीच त्यांची आई कॅन्सरशी झुंज देत आहे.
अमरोहातील व्यक्तीचा मृत्यू
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात अमरोहा जिल्ह्यातील हसनपूर येथील रहिवासी अशोक कुमार (वय 34) यांचा मृत्यू झाला. ते दिल्लीमध्ये बस कंडक्टर म्हणून काम करत होते. ड्युटी संपवून घरी जात असताना हा स्फोट झाला. अशोक हे मंगरौला गावातील त्यांच्या कुटुंबाचे एकमेव आधारस्तंभ होते. त्यांच्या वडिलांचे निधन आधीच झाले होते.
दिल्ली कार स्फोट : यूपीमधील दहशतवादी नेटवर्कशी संबंध
दिल्ली स्फोटानंतर तपास यंत्रणांचे लक्ष आता उत्तर प्रदेशकडे वळले आहे. या दहशतवादी नेटवर्कचे धागे लखनौ आणि लखीमपूरपर्यंत जोडले गेले आहेत. अहमदाबाद येथून गुजरात एटीएसने आयएसकेपी मॉड्यूलशी संबंधित तीन संशयितांना अटक केली आहे, त्यापैकी एक मोहम्मद सोहेल हा लखीमपूर खीरी जिल्ह्यातील निघासन परिसराचा रहिवासी आहे.
दरम्यान, जम्मू-काश्मीर पोलिसांनी लखनौच्या लालबाग येथील डॉ. शाहीन शाहिद यांना अटक केली आहे. पोलिसांनी शाहीन यांच्या कारमधून रायफल आणि जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही कार डॉ. मुजमिल नावाचा व्यक्ती वापरत होता, ज्याचे दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचे समोर आले आहे. डॉ. शाहीन यांना या शस्त्रास्त्रांविषयी माहिती होती की नाही? हे तपास यंत्रणा शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











