Solapur News ,भंडारकवठे : दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर येथे पती-पत्नीचा अल्पशा आजाराने मृत्यू झाला. त्यामुळे दोघांना एकाच चितेवर अग्नी देण्यात आला. हे मन हेलावून टाकणारे दृश्य पाहून अनेकांना शौक अनावर झाला. किसन रामा हेगडे (वय ७०) यांचे शुक्रवारी दुपारी ३ वाजता निधन झाले. रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. मात्र, त्यांचा भाऊ बाहेरगावी असल्याने ते येण्याची वाट पाहत होते तर दुसरीकडे अंत्यसंस्काराची तयारीही सुरू होती. परंतु रात्री ८:४५ वाजता पत्नी भामाबाई किसन हेगडे (वय ६०) यांचे निधन झाले. एकाच वेळी पती-पत्नीचा मृत्यू झाल्याचे वृत्त सगळीकडे पसरले. गावावर शोककळा पसरली. शनिवारी सकाळी ९ वाजता त्या दोघांनाही एकाच चितेवर अग्नी देण्यात आला. त्यांच्या पश्चात दोन मुली, मुलगा, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे.
ADVERTISEMENT
दोघांच्या मृत्यूमुळे संपूर्ण गावाावर शोककळा
दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर येथे पतीच्या निधनानंतर काही तासात पत्नीचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. अल्पशा आजाराने एका दिवसात दोघांचेही निधन झाल्याने संपूर्ण गावातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, दोघांचं निधन झाल्यानंतर त्यांना एकाच चितेवर अग्नी देण्यात आलाय.
हेही वाचा : 'तो' रिपोर्ट येण्याआधी अजित पवारांनी अचानक का घेतली अमित शाहांची थेट दिल्लीत भेट?
किसन रामा हेगडे (वय 70) यांचे शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास निधन झाले. त्यांचा मृत्यू अचानक झाल्याने कुटुंबीय आणि नातेवाईकांनी अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली होती. मात्र, किसन हेगडे यांच्या भावाला बाहेरगावाहून यायचे असल्याने अंत्यसंस्कार रात्री उशिरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. कुटुंबिय वाट पाहत असतानाच सर्वांकडून दु:ख व्यक्त करण्यात येत होतं. दरम्यान, रात्री सुमारे आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी किसन हेगडे यांच्या पत्नी भामाबाई किसन हेगडे (वय 60) यांचेही निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. पतीच्या मृत्यूच्या वेदनेत असतानाच भामाबाई यांनीही अखेरचा श्वास घेतल्याने गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. एका दिवसात दोघांचेही निधन झाल्याची बातमी गावभर पसरताच लोकांना हा प्रसंग पचवणे कठीण झाले.
या दोन्ही मृत्यूंमुळे गावात मोठी खळबळ उडाली. नातेवाईक, शेजारी, गावकऱ्यांनी रात्रीभर त्यांच्या घराकडे धाव घेतली. शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास कुटुंबीयांनी पती-पत्नी दोघांचेही अंत्यसंस्कार एकाच चितेवर करण्याचा निर्णय घेतला. शेवटच्या प्रवासात दोघांना एकत्र अग्नी देण्यात येत असल्याचे दृश्य अनेकांच्या डोळ्यात अश्रू आणणारे ठरले. अंत्यसंस्काराच्या वेळी सर्वत्र शोकमय वातावरण होते.
किसन आणि भामाबाई हेगडे यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा, तसेच सून, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. कुटुंबातील प्रमुख व्यक्तींच्या सलग मृत्यूने सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावातील ज्येष्ठ नागरिकांनीही अशा प्रकारची घटना अत्यंत विरळ असल्याचे सांगत कुटुंबीयांना धीर दिला.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











