ठाणे : पोटात दुखत असल्याने शरीर संबंधास नकार, प्रियकराने प्रेयसीचा खून करुन मृतदेह देसाई खाडीत फेकला

Thane Crime : ठाणे : पोटात दुखत असल्याने शरीर संबंधास नकार, प्रियकराने प्रेयसीचा खून करुन मृतदेह देसाई खाडीत फेकला

Thane Crime

Thane Crime

मुंबई तक

• 10:36 AM • 27 Nov 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

ठाणे : पोटात दुखत असल्याने शरीर संबंधास नकार

point

प्रियकराने प्रेयसीचा खून करुन मृतदेह देसाई खाडीत फेकला

Thane Crime : ठाणे शहरात एका तरुणीच्या खुनाची भीषण घटना उघडकीस आली असून, तिचा मृतदेह बॅगेत भरलेल्या अवस्थेत देसाई खाडीत सापडल्याने मोठी खळबळ उडाली होती. अखेर या प्रकरणात मोठा खुलासा झालाय. पोलिसांनी केवळ 24 तासांत आरोपीला अटक करत प्रकरणाची उकल केली. तपासात लिव्ह-इन असलेल्या या प्रेमी युगुलात झालेल्या वादातून हा खून झाल्याचे समोर आले आहे.

हे वाचलं का?

देसाई खाडीत आढळला मृतदेह

देसाई गावातून कल्याणकडे जाणाऱ्या मार्गावरील पुलाखाली असलेल्या खाडीत 24 नोव्हेंबर रोजी दुपारी एक मोठी प्रवासी बॅग तरंगताना दिसल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पोळ यांनी तातडीने पथकासह घटनास्थळी धाव घेतली. बॅग उघडून पाहता, आत एका तरुणीचा दुमडलेल्या अवस्थेत टाकलेला मृतदेह आढळला. मृतदेह कुजलेला असून तिच्या मनगटावर ‘PVS’ अशी इंग्रजी अक्षरे गोंदलेली दिसली. मात्र ओळख पटविण्यास कोणीही पुढे न आल्याने पोलिसांना तपासाचा धागा सापडत नव्हता.

सोशल मीडियावर मृतदेहाची माहिती प्रसारित करण्यात आली. त्याचबरोबर सहायक निरीक्षक संतोष चव्हाण, अनिल रजपूत आणि योगेश लामखेडे यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली. तपासादरम्यान एका खासगी कारचालकाने महत्त्वाची माहिती दिली. एका व्यक्तीने पुलावरून बॅग खाडीत टाकल्याचे त्याने प्रत्यक्ष पाहिले होते. हा धागा पकडून पोलिसांनी फुटेज तपासले आणि संशय विनोद श्रीनिवास विश्वकर्मा (वय 50) याच्यावर गेला.

24 तासांत आरोपीचा शोध

देसाई गावात राहणारा आणि मूळचा गोरखपूर, उत्तर प्रदेश येथील विनोद विश्वकर्मा हा गवंडी काम करणारा मजूर. पोलिसांनी त्याचा शोध घेत ताब्यात घेतले असता, चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तो गेल्या पाच वर्षांपासून प्रमिला (बदललेले नाव, वय 22) या तरुणीसोबत लिव्ह-इनमध्ये राहत होता.

दोघांमध्ये 21 नोव्हेंबरच्या रात्री वाद झाला. शरीरसंबंध ठेवताना पोटदुखी असल्याचे सांगत प्रमिलाने त्याला विरोध केला. दारूच्या नशेत असलेल्या विनोदचा राग अनावर झाला. संतापाच्या भरात त्याने प्रमिलाचा गळा दाबून खून केला. दुसऱ्या दिवशीही मृतदेह घरातच ठेवला. दुर्गंधी पसरू लागल्याने त्याने मृतदेह मोठ्या बॅगेत कोंबला आणि 24 नोव्हेंबरला खाडी पुलावरून खाडीत फेकून दिला.

पोलिसांचा पुढील तपास सुरू

आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस अधिक तपास करत आहेत. लिव्ह-इन नात्यातील तणाव किती भयानक स्वरूप धारण करू शकतो, याची ही घटना गंभीर जाणीव करून देते.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

निलेश राणेंचा धमाका, भाजप नेत्याच्या घरावर धाड, प्रचाराची धामधूम सुरु असताचा बेहिशोबी 25 लाख सापडले

    follow whatsapp