राजा-सोनम हनिमून प्रकरणात मोठी अपडेट! बसमध्ये सोनमच्या बाजूला बसलेल्या तरुणीने केला मोठा खुलासा,'गाजीपूरमध्ये...'

Raja And Sonam Latest News :  इंदौरच्या राजा रघुवंशी कथित हत्या प्रकरणात एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

Raja And Sonam Honeymoon Case Latest Update

Raja And Sonam Honeymoon Case Latest Update

मुंबई तक

• 05:06 PM • 15 Jun 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

गाजीपूरमध्ये सोनम कशी पोहोचली?

point

राजा रघुवंशी हत्याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर

point

त्या बसमध्ये नेमकं काय घडलं होतं?

Raja And Sonam Latest News :  इंदौरच्या राजा रघुवंशी कथित हत्या प्रकरणात एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. गाजीपूरच्या सैदपूरमध्ये राहणारी उजाला यादवने दावा केला आहे की, ती 8 जूनच्या रात्री सोनम रघुवंशीसोबत वाराणसी रोडवेज बस स्टँडवर एका बसमध्ये चढली होती. दोघींनी गाजीपूरपर्यंत एकत्र प्रवास केला. माध्यमांशी बोलताना उजालाने म्हटलंय की, सोनम गोरखपूरला जाण्यासाठी बसमधून प्रवास करत होती. ती प्लॅटफॉर्म नंबर 7 वर भेटली होती. त्यावेळी ती खूप घाबरली होती. बसमध्ये बसल्यानंतर अनेकदा गोरखपूरच अंतर विचारत होती.

हे वाचलं का?

सोनम एकटी नव्हती..कोण होतं सोनमसोबत? 

उजालाने या घटनेचा नवीन खुलासा केल्यानं तपासात ट्वीस्ट येण्याची शक्यता आहे. उजालाने दावा केला आहे की, सोनमसोबत बसमध्ये अन्य दोन लोकही प्रवास करत होते. जेव्हा उजालाला फोटो दाखवण्यात आला, तेव्हा तिने म्हटलं की, ते दुसरे लोक होते. म्हणजेच या प्रकरणात आणखी दोन चेहरे समोर आले आहेत, ज्यांच्यापर्यंत पोलीस अजूनही पोहोचले नाहीत. 

हे ही वाचा >> मावळमधील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, तब्बल 25 पर्यटक वाहून गेल्याची भीती

उजालाने म्हटलंय की, मी बसमधून सैदपूरच्या पुढे असलेल्या माझ्या गावाजवळ उतरली होती. पण सोनम बसमधून पुढे गेली. उजालाने दावा केला की, सोनमने तिचा मोबाईल मागितला होता. एक नंबर टाईपही केला होता. पण कॉल लागला नाही. नंतर नंबर डिलीट केला.

घरी गेल्यावर टीव्हीवर पाहिलं की, राजा रघुवंशी हत्या प्रकरणाच्य बातम्या येत आहेत. त्यानंतर नंदगंज पोलिसांना फोन करून सोनमने सोबत प्रवास केल्याची माहिती दिली. नंतर उजालाने राजाच्या भावासोबत फोनवर बोलणं केलं. त्यांनी आरोपीचे फोटो पाठवले. पण त्या फोटोत असलेले व्यक्ती बसमध्ये नव्हते. तर दुसरे कोणीतरी सोनमसोबत प्रवास करत होते.

हे ही वाचा >> मुलीचं नाव, घराचं नाव 'काशी', गुप्त काशीला जातानाच हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये यवतमाळच्या तिघांचा अंत

CCTV फुटेज तपासणार, समोर येणार धक्कादायक माहिती

रोडवेज बस स्टँडच्या प्लॅटफॉर्म नंबर 7 वरून सोनम दोन तरुणांसोबत बसमध्ये चढली होती. तेथील सीसीटीव्हीमधून संशयितांचा खुलासा होऊ शकतो. उजालाने म्हटलंय की, मेघालय पोलीसही त्यांच्या संपर्कात आहेत. पोलीस त्यांच्याकडे कसून तपास करत आहेत. 

    follow whatsapp