CBSE 10th,12th 2025 Date Latest Update : सीबीएसई बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागणार असा प्रश्न ही परीक्षा दिलेल्या सर्वच विद्यार्थ्यांसह पालकांनाही पडलाय. उद्या 2 मे 2025 रोजी सकाळी 11 वाजता हा निकाल घोषित केला जाईल, अशी चर्चा रंगलीय. परंतु, सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेन्डरी एज्युकेशन (सीबीएसई)कडून निकालाबाबत मोठी प्रतिक्रिया देण्यात आलीय. बोर्डाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय की, सीबीएसईचे दहावी किंवा बारावीचा निकाल 2 मे 2025 रोजी जाहीर केला जाणार नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्ट चुकीच्या आहेत, असं बोर्डाने म्हटलंय.
ADVERTISEMENT
बिहार बोर्ड रिझल्ट, यूपी बोर्ड रिझल्ट आणि CISCE कडून ICSE आणि ISC बोर्डाचे रिझल्ट घोषित केले आहेत. याशिवाय अनेक राज्यातही निकाल जाहीर करण्यात आले आहेत किंवा निकालाची तारीख सांगण्यात आली आहे.अशातच सीबीएसईकडून हायस्कूल (10 वी) आणि इंटरमीडिएट (12 वी) बोर्ड परीक्षा दिलेले जवळपास 44 लाख विद्यार्थ्यांना या परीक्षेच्या निकालाची प्रतिक्षा लागली आहे.
हे ही वाचा >> पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात नवा ट्वीस्ट, 'त्या' आरोपींच्या वकिलाचे पोलिसांवरच धक्कादायक आरोप
CBSE चा दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागणार?
सीबीएसई दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल लवकरच घोषित करण्यात येणार आहे.परंतु, बोर्डाकडून निकालाची अधिकृत तारीख अद्यापही जाहीर करण्यात आली नाहीय. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल पोस्टच्या माध्यमातून निकालाबाबतच्या तारखेचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सीबीएसई 2 मे रोजी सकाळी 11 वाजता दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करू शकतात.सीबीएसईच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केलं आहे की,2 मे 2025 ला दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर केला जाणार नाही.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इंडिया टुडेशी संवाद साधताना माहिती दिलीय की, निकालाची तारीख अद्यापही घोषित केलेली नाहीय. तसच निकालाबाबत कोणत्याही प्रकारची अधिकृत माहितीही प्रसारित करण्यात आली नाहीय. सीबीएसईने विद्यार्थ्यांना आवाहन केलं आहे की, त्यांनी चुकीच्या माहितीचा आधार घेऊ नये. निकालाबाबतच्या अचूक माहितीसाठी फक्त अधिकृत वेबसाईट cbse.gov.in, cbseresults.nic.in आणि results.cbse.nic.in वर विश्वास ठेवा.
हे ही वाचा >> ब्युटी पार्लरला गेलेल्या नवरीसोबत घडला मोठा कांड! वडिलांना आला हार्ट अटॅक, लग्नमंडपात नवऱ्यानेही...
मागील वर्षी 13 मे 2024 ला दहावी आणि बारावीचा निकाल घोषित करण्यात आला होता. बारावीचा निकाल 87.98 टक्के इतका लागला होता. जो 2023 च्या तुलनेत अधिक चांगला होता.तर दहावीचा निकाल 93.60 टक्के लागला होता. जो वर्ष 2023 च्या तुलनेत 0.48 टक्क्यांनी जास्त होता.
ADVERTISEMENT
