दोन मुलांना घरीच सोडलं..विधवा महिलेनं प्रियकरासोबत ठोकली धूम! पोरांनी रडत रडत पोलीस स्टेशन गाठलं अन्..

Extra Marital Affair Viral News :  उत्तरप्रदेशच्या सहारनपूरमध्ये धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एका विधवा महिलेनं मुजफ्फरनगरचा तरुण अनुजसोबत अफेअर सुरु केलं.

Widow Woman Shocking Viral News

Widow Woman Shocking Viral News

मुंबई तक

01 Aug 2025 (अपडेटेड: 02 Aug 2025, 09:16 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

दोन मुलांना सोडून महिला प्रियकरासोबत गेली पळून

point

प्रियकराचा महिलेच्या संपत्तीवर डोळा

point

26 जुलैला महिला झाली होती बेपत्ता

Extra Marital Affair Viral News :  उत्तरप्रदेशच्या सहारनपूरमध्ये धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एका विधवा महिलेनं मुजफ्फरनगरचा तरुण अनुजसोबत अफेअर सुरु केलं. मागील दोन वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध सुरु होते. दोन मुलं असलेली 42 वर्षांची महिला तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. तसच या महिलेनं जवळपास साडेतान लाख रुपये आणि घरातील दागिनेही सोबत नेलं. त्यानंतर या महिलेच्या दोन्ही मुलांना मोठा धक्का बसला आणि त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

हे वाचलं का?

महिलेचा मुलगा मनिष पोलिसांना म्हणाला, सर आम्हाला वाचवा..आमच्या वडिलांचं निधन झालंय आणि मम्मी कुणासोबत तरी पळून गेली. मी आणि माझा भाऊ गंगोह गावात राहतात. आजारपणामुळे वडिलांचं निधन झालं. आमची मम्मी आम्हाला दोघांना एकटं सोडून प्रियकरासोबत पळून गेली. घरात ठेवलेले सर्व दागिने आणि पैसेही सोबत घेऊन गेली.

आईचा प्रियकर आणि त्याच्या तीन मैत्रीण आम्हाला जीवे मारण्याची धमकी देत आहेत. काही दिवसांपूर्वी आमची मम्मी रिहाना शहजादी आणि नूरजहां महिलांसोबत पंजाबला गेली होती. त्यानंतर ती परतलीच नाही. आम्हाला कळलं की, ती तर तिच्या प्रियकरासोबत पळून गेलीय.

हे ही वाचा >> 'माझ्या मुलीसोबत अश्लील...', 2976 व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्या, बड्या राजकीय नेत्यावर लैंगिक शोषणाचे आरोप!

प्रियकराचा महिलेच्या संपत्तीवर डोळा

मनिषचं म्हणणं आहे की, जेव्हा त्याने रिहान शहजादी आणि नूरजहांला त्याच्या आईबद्दल विचारलं, तेव्हा त्यांनी आम्हा दोन्ही मुलांना जीवे मारण्याची आणि खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी दिली. त्याच्या धमकीमुळे आम्ही खूप घाबरलो आहोत. मम्मीच्या प्रियकराला आमची जमीन आणि इतर संपत्ती लुटायची आहे. यामुळे ते आम्हाला धमकी देत आहेत. 

26 जुलैला महिला झाली होती बेपत्ता

दोन मुलं असलेली विधवा महिला 25 जुलैपासून बेपत्ता आहे. पीडित मुलांनी पोलिसांकडे मागणी केली आहे की, त्यांची मम्मी आणि तिचा प्रियकरासह मैत्रिणींविरोधात कठोर कारवाई व्हावी. जेणेकरून त्यांना न्याय मिळेल. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे. मुलाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत म्हटलं की, ज्यांनी असं कृत्य केलं आहे, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.

हे ही वाचा >> पुण्यातील दौंड तालुक्यात दोन गटात तुफान राडा, पोलिसांचा फौजफाटा तैनात, एकमेकांच्या घरावर दगडफेक

    follow whatsapp