UPSC CSE: महाराष्ट्रातून 'एवढ्या' जणांनी मारली यूपीएससीमध्ये बाजी, पाहा निकालाची संपूर्ण यादी

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) आज (6 मार्च) नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला. अनुज अग्निहोत्रीने परीक्षेत अव्वल स्थान पटकावले. याशिवाय महाराष्ट्रातून किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले याची यादी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.

Mumbai Tak

मुंबई तक

• 09:43 PM • 06 Mar 2026

follow google news

नवी दिल्ली: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा 2025 चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. अनुज अग्निहोत्रीने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. मुलाखत फेरीत पोहोचलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट upsc.gov.in ला भेट देऊन त्यांचे निकाल तपासू शकतात. यावेळी आयोगाने 958 उमेदवारांची निवड केली. तर महाराष्ट्रातील 59 जणांनी यंदा घवघवीत यश मिळवलं आहे. 

हे वाचलं का?

कोण आहेत टॉपर्स?

या वर्षी, अनुज अग्निहोत्री याने नागरी सेवा परीक्षेत पहिला क्रमांक पटकावला, त्यानंतर राजेश्वरी सुवे दुसऱ्या क्रमांकावर, आकांक्षा तिसऱ्या क्रमांकावर, राघव झुनझुनवाला चौथ्या क्रमांकावर आणि इशान भटनागर पाचव्या क्रमांकावर आहे.

महाराष्ट्रातील टॉपर कोण?

तर महाराष्ट्रात हृषीकेश आलासे (Rank 61), आकाश त्रिवेदी (Rank 73), गौरव चोप्रा  (Rank 83),  सायली पगार ( Rank 87), दीक्षा पाटकर (Rank 88), हे टॉपर्स आहेत. याशिवाय महाराष्ट्रातील एकूण 59 जण यंदा UPSC परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.

हे ही वाचा>> मेंढ्या चरायला नेल्या तेव्हाच फोन आला अन्... UPSC मध्ये यश मिळवलेला मेंढपाळ कुटुंबातील बिरदेव डोणे कोण?

958 उमेदवारांची निवड

यावेळी परीक्षेत बसलेल्या 958 उमेदवारांपैकी 317 सामान्य श्रेणीतील, 104 आर्थिकदृष्ट्या कमकुवत प्रवर्गातील, 330 ओबीसी प्रवर्गातील, 158 एससी प्रवर्गातील आणि 73 एसटी प्रवर्गातील होते. निकाल जाहीर होताच टॉपर्सची यादी देखील जाहीर करण्यात आली. उमेदवार पीडीएफमध्ये त्यांची नावे आणि रोल नंबर तपासू शकतात. यूपीएससी परीक्षेने एकूण 958 पदांसाठी भरतीची घोषणा केली. ही परीक्षा 22 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2025 दरम्यान घेण्यात आली आणि 26 फेब्रुवारी 2026 रोजी मुलाखती पूर्ण झाल्या.

भारतात पहिला आलेला अनुज अग्निहोत्री आहे तरी कोण?

अनुज अग्निहोत्री हा यूपीएससी नागरी सेवा परीक्षा 2025 मध्ये टॉपर आहे. तो राजस्थानमधील एका लहानशा गावातील राउतभाटा येथील आहे. त्याने परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

हे ही वाचा>> महाराष्ट्राच्या गळ्यातील ताईत बनलेला बिरदेव डोणेची UPSC मार्कशीट पाहिली का?, मिळाले 'एवढे' Marks

निकाल कसा पाहाल?

निकाल तपासण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाइट, upsc.gov.in ला भेट द्या.

होमपेजवरील निकाल विभागात क्लिक करा.
नंतर नागरी सेवा (मुख्य/अंतिम) परीक्षा, [वर्ष] निकालासाठी लिंकवर क्लिक करा.
निकाल पीडीएफ स्वरूपात उघडेल. त्यानंतर, तुमचा रोल नंबर किंवा नाव शोधण्यासाठी पीडीएफमधील सर्च फंक्शन वापरा.

    follow whatsapp