तू जास्त मोठा झाला का? आत्ता तुला बघतो.. कल्याणमध्ये कुख्यात गुंड पीडीकडून रेल्वे कंत्राटदारावर जीवघेणा हल्ला

मिथिलेश गुप्ता

• 08:49 AM • 07 Mar 2026

Kalyan Crime News : तू जास्त मोठा झाला का ? आत्ता तुला बघतो अशी धमकी देत कल्याणमधील कुख्यात गुंड प्रशांत देशमुख उर्फ पीडी याने आपल्या हस्तकांकडून एका रेल्वे कंत्राटदारावर जीवघेणा हल्ला करवून घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप मुख्य आरोपीला अटक झालेली नाही.

Kalyan Crime News

Kalyan Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

तू जास्त मोठा झाला का? आत्ता तुला बघतो..

point

कल्याणमध्ये कुख्यात गुंड पीडीकडून रेल्वे कंत्राटदारावर जीवघेणा हल्ला

Kalyan Crime News : तू जास्त मोठा झाला का ? आत्ता तुला बघतो अशी धमकी देत कल्याणमधील कुख्यात गुंड प्रशांत देशमुख उर्फ पीडी याने आपल्या हस्तकांकडून एका रेल्वे कंत्राटदारावर जीवघेणा हल्ला करवून घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप मुख्य आरोपीला अटक झालेली नाही.

हे वाचलं का?

हे ही वाचा : 10 वर्षांपासून सूड उगवण्याची वाट पाहात होता, संधी मिळताच तरुणाचा गळा चिरला, बापाच्या अपघाती मृत्यूचा बदला घेतला

'तू खूप मोठा झाला आहेस का ?'

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणमधील विशाल नायडू हे रेल्वेचे कंत्राटदार आहेत. होळीच्या दिवशी त्यांच्या एका मित्राने त्यांना फोन करून प्रशांत देशमुख याच्याशी बोलण्यास सांगितले. पूर्वी ओळख असली तरी चार वर्षांपूर्वी नायडू यांच्या मित्रावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात प्रशांत देशमुखचे नाव आल्याने नायडू यांनी त्याच्याशी संपर्क तोडला होता. होळीच्या दिवशी विशाल नायडू आणि त्यांचा मित्र अनिकेत माने हे घरी असताना अनिकेतच्या मोबाईलवर प्रशांत देशमुखचा फोन आला. त्याने विशाल नायडूला फोन करण्यास सांगितले. त्यानंतर नायडू यांनी प्रशांत देशमुखला फोन केला असता त्याने शिवीगाळ करत तुला चरबी आली आहे, तू खूप मोठा झाला आहेस का ? आमच्या पुढे जातोस का ? आज तुला मारायला प्रतिकला पाठवतो, अशी धमकी दिली. 

'नाहीतर इथेच खलास करू'

या घटनेनंतर काही वेळातच नायडू जेवण आणण्यासाठी घराबाहेर पडले. आधारवाडी सर्कल परिसरात ते पोहोचले असता प्रतिक ठाकरे, शुभम नाडे, सुजय कदम, अक्षय तेली आणि इतर दोन ते तीन जणांनी त्यांना अडवले. यावेळी शुभम नाडेच्या हातात चाकू होता. त्यांनी तेथे जमलेल्या लोकांना चाकूचा धाक दाखवत आमच्या मध्ये पडू नका, नाहीतर इथेच खलास करू, अशी धमकी दिली. यानंतर या सर्वांनी मिळून विशाल नायडू यांना बेदम मारहाण केली.

हे ही वाचा : 8 वर्षांपासून अनेक प्रयत्न केले, तरीही मुल होईना, संतापलेल्या पतीने पत्नीचा गळा चिरला, अन् स्वत:ही केली आत्महत्या

आरोपीचा शोध सुरु

जखमी अवस्थेत त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मुख्य आरोपी प्रशांत देशमुख उर्फ पीडी आणि त्याच्या साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्रशांत देशमुख हा कल्याण परिसरातील कुख्यात गुंड असून त्याच्याविरुद्ध पूर्वीपासून अनेक गुन्हे दाखल असल्याचेही समोर आले आहे.