14 वर्षीय मुलावर ट्यूशन टीचरकडून लैंगिक अत्याचार... मित्राने बदला घेण्याचं ठरवलं अन्... शिक्षकासोबत घडलं भयंकर!

एका 14 वर्षांच्या अल्पवयीन मित्राला त्याच्या ट्यूशन टीचरच्या वाईट कृत्यापासून वाचवण्यासाठी पीडित तरुणाच्या 18 वर्षीय मित्राने कायदा हातात घेतल्याची बातमी समोर आली आहे.

14 वर्षीय मुलावर ट्यूशन टीचरकडून लैंगिक अत्याचार...

14 वर्षीय मुलावर ट्यूशन टीचरकडून लैंगिक अत्याचार...

मुंबई तक

• 10:52 AM • 21 Jan 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

14 वर्षीय मुलावर ट्यूशन टीचरकडून लैंगिक अत्याचार...

point

मित्राने बदला घेण्याचं ठरवलं अन्... शिक्षकासोबत घडलं भयंकर!

Crime News: एका 14 वर्षांच्या अल्पवयीन मित्राला त्याच्या ट्यूशन टीचरच्या वाईट कृत्यापासून वाचवण्यासाठी पीडित तरुणाच्या 18 वर्षीय मित्राने कायदा हातात घेतल्याची बातमी समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी किशोरला अटक केली असून त्याने त्याच्यावरील लैंगिक अत्याचाराचा बदला घेण्यासाठी हे भयंकर कृत्य केल्याचं सांगितलं जात आहे. संबंधित घटना ही 2 जानेवारी रोजी घडली असून कोंडली पुलाजवळ एका तरुणावर चाकूने वार करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. 32 वर्षीय जय प्रकाश अशी जखमी तरुणाची ओळख समोर आली असून त्याच्या पोटावर आणि पाठीवर गंभीर जखमा होत्या आणि त्यानंतर त्याला तातडीने एम्स ट्रॉमा सेंटर येथे रेफर करण्यात आलं. 

हे वाचलं का?

घटनास्थळावर तपास केला असता पीडित तरुणाचा मोबाईल फोन आणि पैसे गायब होते. प्रकाशने पोलिसांना सहकार्य करण्यास थांबवल्यानंतर हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचं झालं. त्यानंतर, दिल्ली पोलिसांनी टेक्निकल सर्व्हिलांसच्या मदतीने तपास सुरू केला आणि जवळपास 150 सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. एका फुटेजमध्ये कोंडली पुलाजवळ पीडित प्रकाश आपल्या सायकलवरून तरुणाला घेऊन जाताना दिसला. 

हे ही वाचा: कैसा हराया, विजयी होताच जितेंद्र आव्हाडांना डिवचलं, मुंब्र्यात AIMIM चा आवाज बुलंद करणारी सहर शेख कोण आहे?

23 मिनिटांनंतर, जय प्रकाश एकटा रक्ताने माखलेल्या अवस्थेत परत येताना दिसला. त्यानंतर, पोलिसांनी सायकलवर मागे बसलेल्या अल्पवयीन तरुणाची ओळख पटवली आणि ताब्यात घेतलं. त्यावेळी, त्याने सुरुवातीला चोरीची खोटी कहाणी सांगितली. मात्र, कठोर चौकशी केल्यावर सत्य उघडकीस आलं. त्या अल्पवयीन तरुणाने सांगितलं की, त्याचा शिक्षक गेल्या सहा महिन्यांपासून त्याचं लैंगिक शोषण करत होता आणि त्याने त्याचा 18 वर्षीय मित्र देवराजला ही बाब सांगितली. 

हे ही वाचा: लग्नानंतर पत्नीचे दोन तरुणांसोबत संबंध, विरोध केल्यावर धमक्या आणि छळ; शेवटी पतीने स्वत:ला संपवलं

त्यानंतर, दोघांनी मिळून जय प्रकाशाला धडा शिकवण्याचा योजना आखली. ठरल्याप्रमाणे, नाला रोडच्या एका अंधाऱ्या आणि निर्जन ठिकाणी प्रकाशवर चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्याला चोरीची घटना दाखवण्यासाठी देवराजने त्याचा मोबाईल आणि त्याच्याकडील जवळपास 300 रुपये हिसकावून घेतले. पोलिसांनी आता देवराजला अटक केली असून त्याच्याजवळील फोन आणि चाकू सुद्धा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ट्यूशन टीचर जय प्रकाशविरुद्ध पॉक्सो अॅक्ट आणि भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला. तसेच, आरोपी देवराजविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणि चोरीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करून कारवाई केली जात आहे. आता पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून दोघांची चौकशी केली जात आहे. 

    follow whatsapp