आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर वर्गमित्रांनी केला बलात्कार, मैत्रिणीनेच अडकवले जाळ्यात; धक्कादायक प्रकरण

Crime News : एका 15 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर तिच्याच वर्गमित्राने आपल्या साथीदारांसह सामूहिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत पीडितेचा वर्गमित्र, तिची एक मैत्रीण आणि अन्य तीन अशा एकूण पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 01:41 PM • 25 Mar 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर वर्गमित्रांनी केला बलात्कार

point

मैत्रिणीनेच अडकवले जाळ्यात

Crime News : एका 15 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर तिच्याच वर्गमित्राने आपल्या साथीदारांसह सामूहिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत पीडितेचा वर्गमित्र, तिची एक मैत्रीण आणि अन्य तीन अशा एकूण पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्यांमध्ये तीन आरोपी अल्पवयीन असून, त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे, तर गगनदीप नावाच्या 20 वर्षीय मुख्य आरोपीला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. चंदीगड शहराच्या अतिसंरक्षित 'व्हीव्हीआयपी' क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या न्यू चंदीगड परिसरातील ही घटना आहे.

हे वाचलं का?

निर्जनस्थळी नेत अत्याचार

इयत्ता आठवीत शिकणाऱ्या या विद्यार्थिनीला तिचा वर्गमित्र आणि त्याचे तीन मित्र धमकावून एका निर्जन स्थळी घेऊन गेले होते. तिथे तिच्यावर पाशवी अत्याचार केल्यानंतर त्यांनी या कृत्याचे चित्रीकरण केले. 'कोणाला काही सांगितल्यास जिवानिशी मारून टाकू', अशी धमकी देऊन ते वारंवार तिच्यावर अत्याचार करत राहिले. अनेक दिवस हा खेळ सुरू होता. पीडिता प्रचंड दहशतीखाली असल्याने तिने घरच्यांना काहीच सांगितले नाही, मात्र एका आरोपीने रागाच्या भरात तिचा अश्लील व्हिडिओ व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर केला आणि परिसरात खळबळ उडाली.

हे ही वाचा : अशोक खरातच्या दहावीच्या रिझल्टची कॉपी समोर, पाहा किती विषयात नापास? कोणत्या विषयात किती मार्क? Photo

मैत्रिणीनेच केली आरोपींना मदत

व्हिडिओ व्हायरल झाल्याची कुणकुण लागताच आपली बदनामी होईल, या भीतीने पीडितेने अखेर धीर एकवटून आपल्या आईला घडलेला सर्व प्रकार सांगितला. मुलीसोबत घडलेला प्रकार ऐकून कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली. यानंतर तात्काळ पोलिसांत धाव घेऊन तक्रार नोंदवण्यात आली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून अवघ्या काही तासांतच पाचही आरोपींना अटक केली. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे, पीडितेच्या एका मैत्रिणीनेच तिला या नराधमांच्या जाळ्यात ओढण्यास मदत केल्याचा आरोप आहे, त्यामुळे तिलाही सहआरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे.

हे ही वाचा : 'देवा भाऊ तुम्ही शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला...', कोण संतापलं एवढं?

वेगवेगळ्या ठिकाणी नेत अत्याचार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात पॉक्सो कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, आरोपींनी विद्यार्थिनीला धमकावून वेगवेगळ्या ठिकाणी नेले आणि तिच्यावर अत्याचार केले. अटकेत असलेला वीस वर्षीय गगनदीप याची कसून चौकशी केली जात असून, या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.