एकत्र जेवण केलं, नवऱ्याने बायकोसह तिच्या बॉयफ्रेंडवर केला गोळीबार, दुहेरी हत्याकांड आलं बाहेर

crime news : पतीने आपल्या पत्नीची आणि तिच्या प्रियकरावर निर्घृणपणे गोळ्या झाडून हत्या केली. धक्कादायक बाब अशी की, हत्या होण्याआधी काही वेळापूर्वी ते तिघे एकाच खोलीत बसून एकत्र जेवण करत होते. 

Mumbai Tak

मुंबई तक

• 04:05 PM • 24 Mar 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

पत्नीने फहीम नावाच्या तरुणाशी अवैध प्रेमसंबंधाचा संशय 

point

तिघांमध्ये मोठा वाद अन् नवऱ्याने दोघांवर केला गोळीबार 

Crime News : दिल्लीतील गाझियाबादच्या लोणी परिसरात रात्री एक भीषण घटना घडली होती. ट्रोनिका सिटी पोलीस ठाणे हद्दीतील रामपार्क परिसरात एका पतीने आपल्या पत्नीची आणि तिच्या प्रियकराची निर्घृणपणे गोळ्या झाडल्या. धक्कादायक बाब अशी की, हत्या होण्याआधी काही वेळापूर्वी ते तिघे एकाच खोलीत बसून एकत्र जेवण करत होते. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : 3 हजार खासगी व्हिडिओ बनवले, अखेर डॉक्टर एकतर्फी प्रेमप्रकरणात अटक

पत्नीने फहीम नावाच्या तरुणाशी अवैध प्रेमसंबंधाचा संशय 

पोलिसांच्या म्हणण्यांनुसार, आरोपी पती रशीदला त्याची पत्नी शबनम (वय 36) आणि मित्र फहीम (वय 32) यांच्यात अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. रशीदला वारंवार विरोध करत असे, ज्यामुळे कुटुंबात दीर्घकाळ तणाव निर्माण झाला होता. 

रात्री सुमारे 12:40 वाजता, रशीदच्या अपार्टमेंटमध्ये वाद झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. जेव्हा पोलिसांना घटनास्थळी धाव घेतला असता, खोलीतील दृश्य भयानक होते. संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपी रशीद हा घटनास्थळावरून पळून गेल्याची माहिती आहे. 

तिघांमध्ये मोठा वाद अन् नवऱ्याने दोघांवर केला गोळीबार 

संबंधित प्रकरणात घटनेचे गांभीर्य ओळखून डीसीपी ग्रामीण सुरेंद्र नाथ तिवारी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी मोठ्या पोलीस बंदोबस्तात आणि न्यायवैद्यक पथकासह घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासातून समोर आले की, संभाषणादरम्यान तिघांमध्ये मोठा वाद झाला आणि रागाच्या भरात रशीदने दोघांवरही गोळीबार करत त्यांची हत्या केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुरावे गोळा केले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. 

हे ही वाचा : सोलापूरमध्ये उन्हाच्या कडाक्यात थंडावा मिळवण्यासाठी जिवलग मित्र पोहायला गेले, तलावात बुडून दोघांचा दुर्दैवी अंत

डीसीपी ग्रामीण सुरेंद्रनाथ तिवारी यांनी सांगितलं की, आरोपी रशीदला अटक करण्यासाठी चार विशेष पोलीस पथके तयार केली आहेत. पोलीस त्याच्या लपण्याच्या ठिकाणावर छापे टाकत आहेत. कुटुंबीयांकडून लेखी तक्रार मिळाल्यानंतर कायदेशीर कारवाई सुरु करण्यात आली. या दुहेरी हत्याकांडानंतर परिसरात शांतता पसरली असून, आरोपीला लवकरच तुरुंगात टाकले जाणार, असा पोलिसांनी दावा केला आहे.