50 वर्षांच्या काकाकडून विवाहित पुतणीसोबत नको ते.. 'ती' गोष्ट बाहेर आली अन्...

Beed Crime: केज तालुक्यातील युसुफवडगावमध्ये नराधम चुलत चुलत्याने विवाहित पुतणीला गुंगीचे औषध पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

in kaij taluka of beed district an uncle sexually assaulted his married niece

प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: ग्रोक

मुंबई तक

• 07:00 AM • 24 Mar 2026

follow google news

रोहिदास हातागळे, बीड: केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलिस ठाण्यांच्या हद्दीत एका खेडेगावातील शेतवस्तीवर ५० वर्षीय चुलत चुलत्याने आपल्या 19 वर्षीय विवाहित पुतणीला पाण्यात गुंगीचे औषध मिसळून पाजले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. ही धक्कादायक घटना 14 ऑक्टोबर 2025 रोजी घडली होती, मात्र पाच महिन्यांनंतर शनिवारी (21 मार्च) सायंकाळी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी सध्या जिल्ह्याबाहेर फरार असून पोलीस त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत.

हे वाचलं का?

नेमकी घटना काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 वर्षीय विवाहित तरुणी 14 ऑक्टोबर 2025 रोजी आपल्या माहेरी आई-वडिलांकडे आली होती. दुपारी 1.30 ते 3.30 वाजेदरम्यान शेतवस्तीवर शेजारी राहणाऱ्या तिच्या 50 वर्षीय चुलत चुलत्याने तिला पाण्यातून गुंगी येणारे औषध पाजले. त्यानंतर नराधमाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. अत्याचारानंतर आरोपीने तिला धमकी दिली की, “ही घटना कोणाला सांगितलीस तर तुझ्या आई-वडिलांना जीवे मारून टाकीन.” या भीतीमुळे पीडित मुलीने त्या वेळी ही गोष्ट कोणालाही सांगितली नव्हती.

हे ही वाचा>> पोटच्या दोन लेकींना आईने संपवलं, पोलिसांनी केली अटक, नेमकं काय घडलं?

मात्र नंतर माहेरी असतानाच तिने घडलेली घटना आई-वडिलांना सांगितली. त्यानंतर कुटुंबाने निर्णय घेत शनिवारी सायंकाळी युसुफवडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. गुन्ह्याची नोंदणी गु. र. नं. 68/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 64(2)(एफ) व 351(2) नुसार करण्यात आली आहे.

हे ही वाचा>> भाडेकरुचे मालकिणीसोबत अफेयर, सासूने अनेकदा 'त्या' अवस्थेत पाहिले; शेवटी नको तेच घडलं!

सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भारत बर्डे हे पुढील तपास करीत आहेत. आरोपी सध्या जिल्ह्याबाहेर असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्याचा ठावठिकाणा अद्याप लागलेला नसला तरी पोलीस त्याच्या मागावर आहेत. लवकरच नात्याला काळिमा फासणाऱ्या आणि पुतणीचा संसार उध्वस्त करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात येईल, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

ही घटना केज तालुक्यातील ग्रामीण भागात नात्यातील विश्वासघात आणि महिलांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा चर्चा निर्माण करणारी ठरली आहे. पोलीस तपास सध्या सुरू असून, पीडित मुलीला आवश्यक वैद्यकीय व कायदेशीर मदत देण्यात येत आहे.