पोटच्या दोन लेकींना आईने संपवलं, पोलिसांनी केली अटक, नेमकं काय घडलं?

मुंबई तक

crime news : 17 दिवसांपूर्वी एक मन हेलावून टाकाणारी घटना घडली आहे. काही दिवसांआधी आईनेच आपल्या मुलीची हत्या केली. हत्या केल्याप्रकरणी आई सुनीता आरोरा यांना त्यांच्या मृत्यूप्रकरणी अटक केली आहे. तीन दिवसांपूर्वी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर तपासणी केल्यानंतर, पोलिसांनी पुराव्याच्या आधारे ही कारवाई केली.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

बातम्या हायलाइट

point

दरवाजा उघडताच खोलीत भयंकर...

point

घटनास्थळी फिनाईलच्या गोळ्या आढळल्या

Crime News : नवी दिल्लीतील मालवीयनगरमध्ये 17 दिवसांपूर्वी एक मन हेलावून टाकाणारी घटना घडली आहे. आईनेच आपल्या दोन्ही मुलींची हत्या केली. या प्रकरणी आई सुनीता आरोरा यांना त्यांच्या मृत्यूप्रकरणी अटक केली. तीन दिवसांपूर्वी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर तपासणी केल्यानंतर, पोलिसांनी पुराव्याच्या आधारे ही कारवाई केली. प्राथमिक तपासातून समोर आले की, कौटुंबिक वादातून तणाव आणि कौटुंबिक परिस्थितीतून ही दुर्दैवी घटना घडली. 

हे ही वाचा : कोल्हापूरमधील वाडी जोतिबा मंदिरात पुजाऱ्यांकडून भाविकांना जबर मारहाण, गुलालासह नारळ फेकून मारल्याचे कृत्य

दरवाजा उघडताच खोलीत भयंकर...

पोलिसांच्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना 5 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6:10 वाजताच्या सुमारास मालवीयनगरात घडली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, दरवाजा आतून बंद होता. नंतर दरवाजा उघडून आतून प्रवेश केल्यानंतर, त्यांनी राधिका आरोरा (वय 33)  आणि गुनिषा अरोरा (वय 28) या दोन तरुणींचे मृतदेह वेगवेगळ्या खोल्यांमध्ये आढळले होते. 

राधिकाचा चेहरा हा उशीने झाकलेल्या अवस्थेत आढळून आला होता, तर दुसरीकडे तरुणीचा गळा हा क्रेप बँडेजने आवळलेल्या स्थितीत होता. दोघींच्याही हातांवर कापल्याच्या खुणा होत्या. त्यांची आई, सुनीता आरोरा, घटनास्थळी बेशुद्ध अवस्थेत आढळल्या आणि त्यांना तात्काळपणे रुग्णालयात पाठवण्यात आले होते. 

घटनास्थळी फिनाईलच्या गोळ्या आढळल्या

पोलिसांना तपासादरम्यान, घटनास्थळी फिनाईलच्या गोळ्या आढळून आल्या होत्या. मुलींनी आत्महत्येचा बनाव रचत लेकींना संपवल्याची शक्यता आहे. पोलिसांनी महिलेची चौकशी केली, जिथे तिने आपल्या गुन्ह्याचा कबुलीनामा दिला. 

हे वाचलं का?