कोल्हापूरमधील वाडी जोतिबा मंदिरात पुजाऱ्यांकडून भाविकांना जबर मारहाण, गुलालासह नारळ फेकून मारल्याचे कृत्य

मुंबई तक

Kolhapur News : कोल्हापूरमध्ये वाडी रत्नागिरी जोतिबा मंदिरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला. 15 ते 20 पुजाऱ्यांकडून भाविकांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची माहिती आहे. मंदिर परिसरात गुलाल उधळून नारळ फेकून मारण्याचे कृत्य करण्यात आल्याने भाविकांना त्रास झाला. 

ADVERTISEMENT

Kolhapur News
Kolhapur News
google news

बातम्या हायलाइट

point

भाविकांच्या डोक्यात नारळाने हल्ला

point

पुजारी व सिक्युरिटी गार्ड यांच्याकडून भाविकांना बेदम मारहाण

Kolhapur News : कोल्हापूरमध्ये वाडी रत्नागिरी जोतिबा मंदिरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला. 15 ते 20 पुजाऱ्यांकडून भाविकांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची माहिती आहे. दुपारी तब्बल दोन तास शासनकाठी जोतिबा मंदिर परिसरात, परिते गावचे भाविक हे या ठिकाणी  उपस्थित होते. भाविकांनी मंदिर परिसरात गुलाल उधळून नारळ फेकून मारण्याचे कृत्य केल्याची माहिती समोर आल्याची माहिती आहे.   

हे ही वाचा : "देवेंद्र फडणवीस.., तुमच्या घटक पक्षातील अनेक नावांभोवती संशय..", अशोक खरात प्रकरणी राज ठाकरेंची प्रतिक्रिया

भाविकांच्या डोक्यात नारळाने हल्ला 

दरम्यान, भाविकांना नेमकी मारहाण कशामुळे केली जात आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. यासंदर्भात नेमकी काय कारवाई होणार हे पाहणं गरजेचं असणार आहे. तसेच घडलेल्या घटनेनुसार काही भाविकांच्या डोक्यात दोन ते तीन नारळ सुद्धा मारल्याचे व्हिडिओतून दिसून आले.

 पुजारी व सिक्युरिटी गार्ड यांच्याकडून भाविकांना बेदम मारहाण

वाडी रत्नागिरी जोतिबा मंदिर एक एप्रिल रोजी मुख्य यात्रेचा दिवस राज्यासह कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्यातील अनेक मानाच्या शासनकाठी मंदिराच्या परिसरात येत असतात. भाविकांची समजूत काढण्याऐवजी पुजारी व सिक्युरिटी गार्ड यांनी बेदम मारहाण केल्याचं सांगण्यात येत आहे. 

हे ही वाचा : साताऱ्याच्या ZP राड्यानंतर एकनाथ शिंदे विधानसभेत आक्रमक, देवेंद्र फडणवीसांचा तातडीने मोठा निर्णय

या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाल्याची माहिती आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये संमिश्रपणे प्रतिक्रिया उमटताना दिसतायत. 

हे वाचलं का?