सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाची हत्या, आधी जीवघेणी मारहाण अन् नंतर विहिरीत फेकले; मित्रानेच केला घात

Crime news : भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी तयारी करणाऱ्या एका 16 वर्षीय तरुणाची त्याच्याच मित्राने हत्या केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे आरोपी मित्र हत्या करुनच थांबला नाही, तर त्याचा मृतदेह जवळच्या विहिरीत फेकून दिला.

Crime news

Crime news

मुंबई तक

• 03:50 PM • 22 Mar 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाची हत्या

point

आधी जीवघेणी मारहाण अन् नंतर विहिरीत फेकले

point

मित्रानेच केला घात

Crime news : भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी तयारी करणाऱ्या एका 16 वर्षीय तरुणाची त्याच्याच मित्राने हत्या केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे आरोपी मित्र हत्या करुनच थांबला नाही, तर त्याचा मृतदेह जवळच्या विहिरीत फेकून दिला. यानंतर पळून जाताना शेताला असलेल्या एका कुंपणाच्या तारांनी आरोपीच्या शरीरावर 35 जखमा झाल्याची माहिती समोर आली आहे.  या अवस्थेतच आरोपी पोलिस स्टेशनमध्ये पोहोचला.  पोलिस स्टेशनमध्ये पोहोचून त्याने नेमके काय सांगितले, जाणून घेऊया. उत्तर प्रदेशातील आग्रा परिसरातील ही घटना आहे.

हे वाचलं का?

मित्राने रचला बनाव 

देवेंद्र सिंह यांचा मुलगा चंद्रवीर हा शुक्रवारी (21 मार्च) संध्याकाळी मित्रांसोबत फिरायला जातो असे सांगून घरातून बाहेर पडला होता. मात्र, उशिरापर्यंत तो घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याची शोधमोहीम सुरू केली. दरम्यान, रात्री 10 वाजण्याच्या सुमारास त्याचा मित्र अभिषेक रक्ताळलेल्या अवस्थेत पोलीस ठाण्यात पोहोचला. त्याने सुरुवातीला चंद्रवीरनेच आपल्यावर हल्ला केल्याचा बनाव रचला होता. परंतु, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता विहिरीत चंद्रवीरचा मृतदेह तरंगताना आढळून आला.

हे ही वाचा : अशोक खरात प्रकरण : पीडितेला साई बाबाच्या मंदिराजवळ गाठलं, गर्दीतून 'तो' आला; अन् कानात म्हणाला, 'तुझे...'

'अशी' झाली हत्या

पोलिसांना घटनास्थळाजवळ दोघांच्या चपला आणि रक्ताचे डाग सापडले आहेत. तसेच 60 मीटर अंतरावर असलेल्या शेतातील काटेरी तारांवरही रक्ताचे थारोळे आढळले, जिथून आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मृतदेहाच्या पोस्ट मार्टम अहवालात चंद्रवीरचा मृत्यू पाण्यात बुडल्याने झाल्याचे समोर आले असून, त्याच्या शरीरावर मारहाणीच्या आठ खुणा आढळल्या आहेत. आरोपीने आधी त्याला बेदम मारहाण केली आणि नंतर मरणासन्न अवस्थेत विहिरीत फेकून दिल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

हे ही वाचा : कुटुंबातील पाच लोकांचा अंत, दोघांचा लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, 3 मुलांना विष पाजल्याचा पोलिसांचा संशय

गावात तणावाचे वातावरण

याप्रकरणी चंद्रवीरच्या वडिलांनी अभिषेकसह उमेश, रामू, राजकुमार, विजय सिंह आणि काही अज्ञातांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी संध्याकाळी कडक पोलीस बंदोबस्तात चंद्रवीरवर अंत्यसंस्कार करण्यात आले. गावात सध्या तणावाचे वातावरण असल्याने मोठा पोलीस फाटा तैनात करण्यात आला आहे. डीसीपींनी सांगितले की, जखमी आरोपीवर उपचार सुरू असून, त्याची शुद्धी आल्यानंतर चौकशी केल्यावरच या हत्येमागचे नेमके कारण स्पष्ट होईल.
 

    follow whatsapp