अशोक खरात प्रकरण : पीडितेला साई बाबाच्या मंदिराजवळ गाठलं, गर्दीतून 'तो' आला; अन् कानात म्हणाला, 'तुझे...'
Ashok Kharat Case : नाशकातील अशोक खरात या भोंदूबाबाचं प्रकरण हे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या दोन FIR मुळे उघडकीस आले. आक्षेपार्ह व्हिडीओ दाखवून खंडणी मागण्याचा दोघांचा डाव फसला आणि हे सगळं प्रकरण उजेडात आलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अशोक खरात प्रकरण : पीडितेला साई बाबाच्या मंदिराजवळ गाठलं
गर्दीतून 'तो' आला; अन् कानात म्हणाला, 'तुझे...'
Ashok Kharat Case : संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारे अशोक खरात प्रकरण समोर येण्यासाठी दोन एफआयआर आणि दोन मित्र कारणीभूत ठरले आहेत. विशेष म्हणजे आक्षेपार्ह व्हिडीओ आणि फोटो दाखवून पैसे किंवा खंडणीची मागणी केल्याने 2 FIR झाल्या. त्यातूनच पोलिसांना हे व्हिडीओ मिळाले आणि संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. नेमकी क्रोनोलॉजी काय आहे? समजून घेऊयात..
पहिली FIR अशोक खरात यानेच दिली?
दोन मित्रांपैकी एक मित्र हा पुण्यातला आहे, तर दुसरा मुंबईतला होता. दोघेही अशोक खरातच्या संपर्कात होते. मात्र, एकजण जास्तच संपर्कात होता. यातील एकजण खरातचा ऑफिस बॉय होता. त्याच्याकडे अशोक खराचे सर्व व्हिडीओ आले. त्याला फोटो देखील मिळाले. हे फोटो घेऊन दोन्ही मित्र पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या महिलेकडे गेले. हे प्रकरण जगासमोर आणावे, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, या महिलेने अशोक खरातची भक्त असलेल्या महिलेला याची माहिती दिली. भक्त महिलेने याची माहिती अशोक खरातला दिली. त्यानंतर अशोक खरात याने या प्रकरणात पहिली एफआयआर दाखल केली. हे 5 कोटींची खंडणी मागत आहेत, अशी तक्रार खरात याने सिन्नरच्या वाळवी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. ही या प्रकरणातील पहिली एफआयआर होती.
हेही वाचा : मुलीचे 'आयएएस' अधिकाऱ्यासोबत लग्न, 30 लाख रुपये उधळले अन् लग्नानंतर अवघ्या काही तासांतच...धक्कादायक प्रकरण
दुसरी तक्रार पीडित महिलेने दिली?
दरम्यान, ऑफिस बॉय निरज जाधवने अशोक खरातला धडा शिकवायचा असं ठरवलं होतं. कारण त्याने अतिशय अश्लाघ्य कृत्ये केली होती. हे निरज जाधवच्या घरापर्यंत आलं होतं. अशोक खरातकडे येऊन गेलेल्या महिलेचा फोटो आणि व्हिडीओ निरज जाधवकडे होता. या निरज जाधवने त्या पीडित महिलेला गाठलं. त्यानंतर ती महिला घाबरली. महिला म्हणाली, हे फोटो एआयच्या माध्यमातून बनवण्यात आले आहेत. वन टाईम-सीन या पद्धतीने महिलेला हे फोटो दाखवण्यात आले होते. यामुळे निरज जाधवविरोधात शिर्डीमध्ये तक्रार झाली. पीडितेने तक्रारीत म्हटलं की, "3 वर्षांपूर्वी मी ओक्स प्रॉपर्टीमध्ये (अशोक खरातचं ठिकाण) जात होते. तिथे निरज जाधव ऑफिस बॉय होता. या जाधवने मला 15 दिवसांपूर्वी एआय जनरेटेड फोटो पाठवले आहेत. हा फोटो व्हायरल करण्याची धमकी तिला देण्यात आली. (हा फोटो तिचा आणि अशोक खरातचा होता) थोड्या वेळात त्याने हे फोटो डिलिट केल्याचं सांगितलं. मी घाबरले. कुटुंबियांना मी काही सांगितलं नाही. मात्र, सात दिवसांपूर्वी अनोळखी व्यक्ती मला साई-बाबा मंदिराजवळ भेटला. त्याने सांगितलं की, निरज जाधवकडे तुझे अश्लील फोटो आहेत, ते आम्ही व्हायरल करणार आहोत. आणि तो गर्दीतून निघून गेला.










