कुटुंबातील पाच लोकांचा अंत, दोघांचा लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, 3 मुलांना विष पाजल्याचा पोलिसांचा संशय

मुंबई तक

crime news : एकाच कुटुंबातील तब्बल पाच जणांचा मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना आहे. एका भाडेतत्त्वावर राहणाऱ्या घरात तीन निष्पाप मुलांसह कुटुंबातील पाच सदस्यांचे मृतदेह आढळून आले. या घटनेनं परिसरात एकच खळबळ माजली.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

दोन महिला गळफासाला लटक्याचे पाहून मोठा धक्का

point

मुलांना विष पाजल्याचा पोलिसांना संशय 

Crime news : एकाच कुटुंबातील तब्बल पाच जणांचा मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना आहे. एका भाडेतत्त्वावर राहणाऱ्या घरात तीन निष्पाप मुलांसह कुटुंबातील पाच सदस्यांचे मृतदेह आढळून आले. या घटनेनं परिसरात एकच खळबळ माजली. प्राथमिक तपासातून समोर आले की, सामूहिक आत्महत्येची घटना असून, दोन महिलांनी आपल्या मुलांची हत्या केल्यानंतर स्वत:चे जीवन संपवले. ही घटना केरळातील कोची शहरात घडल्याचे वृत्त आहे. 

हे ही वाचा : यवतमाळ : 6 वर्षाची मुलगी बेपत्ता, 'एवढ्या' दिवसानंतर पोत्यात कोंबलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, गावातील घराची झडती सुरु

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये श्रीकुमारी (वय 58), त्यांची मुलगी अश्वथी नायर (वय 36) आणि अश्वथीच्या तीन मुलांचा समावेश आहे. मुलांमध्ये 14 आणि 4 वर्षांचे दोन मुलं आणि 2 वर्षांच्या एका मुलीचा देखील त्यात समावेश आहे. हे कुटुंब मूळचे तिरुवनंतपुरम येथील विलाप्पिलसाला येथील रहिवासी आहे. 

तपासातून उघडकीस आलं की, हे कुटुंब फेब्रुवारी महिन्यापासून कोचीतील वदुथला येथील करास्का रोडवरील भाडेतत्त्वाच्या घरात राहत होते. कुटुंबातील थोरल्या मुलावर जवळच्याच एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते आणि त्याची काळजी घेण्यासाठी तिथेच राहत होते. दरम्यान असे वृत्त की, ते लवकरात लवकर घर खाली कारणार होते, परंतु त्यापूर्वीच ही भीषण घटना घडल्याचे वृत्त आहे. 

दोन महिला गळफासाला लटक्याचे पाहून मोठा धक्का

दरम्यान, ही घटना शनिवारी दुपारी घडली, एक टेबल टीव्ही ऑपरेटर कामासाठी त्या घरी आला होता. त्याने खिडकीतून खोलीत डोकावून पाहिले, तेव्हा दोन महिला गळफासाला लटक्याचे पाहून मोठा धक्का बसला होता. ऑपरेटरने आरडाओरड केली आणि आजूबाजूच्या लोकांना व पोलीसांना याबाबतची माहिती दिली होती. 

हे वाचलं का?

    follow whatsapp