यवतमाळ : 6 वर्षाची मुलगी बेपत्ता, 'एवढ्या' दिवसानंतर पोत्यात कोंबलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, गावातील घराची झडती सुरु

मुंबई तक

Yavatmal crime : यवतमाळ जिल्ह्यातील दरवा तालुक्यातील बोथ गावातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सहा वर्षीची बेपत्ता झालेली मुलगी शिवानी पंकज जाधव हिचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळून आला. या घटनेनं संपूर्ण परिसरात शोक पसरला आहे.

ADVERTISEMENT

Yavatmal Crime
Yavatmal Crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुलीचा शोध घेण्यासाठी 25 हजार रुपयांचे बक्षीस

point

शिवानीचा मृतदेह पोत्यात बांधलेल्या अवस्थेत

Yavatmal crime : यवतमाळ जिल्ह्यातील दरवा तालुक्यातील बोथ गावातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सहा वर्षीची बेपत्ता झालेली मुलगी शिवानी पंकज जाधव हिचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळून आला. या घटनेनं संपूर्ण परिसरात शोक पसरला आहे. या घटनेनं गावात संतापाची लाट उसळल्याचं चित्र आहे. 

हे ही वाचा : अशोक खरातचा आणखी एक किळसवाणा व्हिडीओ, मुलीला टीशर्ट वर करायला सांगितला अन् पोटावर... VIDEO

मुलीचा शोध घेण्यासाठी 25 हजार रुपयांचे बक्षीस

शिवानी ही 20 मार्च रोजी बेपत्ता झाली होती. पोलीस पथक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गावकऱ्यांनी तपास सुरु केला. या प्रकरणात यवतमाळ जिल्हा पोलिसांनी मुलीचा शोध घेण्यासाठी 25 हजार रुपयांचे बक्षीस देखील जाहीर केले होते. कोणालाही कसलाही सुगावा न लागू देता गावातील सर्व घरांचा शोध घेण्यात आला होता. 

सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली होती. याचदरम्यान, पोलिसांनी श्वान पथकाच्या मदतीने आपला तपास देखील करण्यात आला. श्वान पथक एकाच ठिकाणी दोनदा थांबले, ज्यामुळे पोलिसांचा संशय अधिक वाढला. पोलिसांच्या सांगण्यावरून गावातील एकूण एक घराची झडती सुरु झाली. 

शिवानीचा मृतदेह पोत्यात बांधलेल्या अवस्थेत

दरम्यान, गावचे पाटील आणि काही नागरिकांच्या उपस्थितीत शोधमोहिम सुरु केली. यादरम्यान, सोनू विलास जाधव आणि कैलाश विलास जाधव यांच्या घरात शिवानीचा मृतदेह एका पोत्यात बांधलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या घटनेनं गावात एकच खळबळ माजली. 

हे वाचलं का?

    follow whatsapp