अशोक खरातचा आणखी एक किळसवाणा व्हिडीओ, मुलीला टीशर्ट वर करायला सांगितला अन् पोटावर... VIDEO
Ashok Kharat Viral Video : नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याच्या अघोरी कृत्यांचा पर्दाफाश करणाऱ्या नव्या पुराव्यांमुळे खळबळ उडाली असून, एका अल्पवयीन मुलीसोबत केलेल्या अश्लाघ्य कृत्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अशोक खरातचा आणखी एक किळसवाणा व्हिडीओ
मुलीला टीशर्ट वर करायला सांगितला अन् पोटावर... VIDEO
Ashok Kharat Viral Video : संपूर्ण महाराष्ट्रात सध्या 'कॅप्टन' अशोक खरात नावाच्या भोंदूबाबाने केलेल्या कारनाम्यांमुळे खळबळ उडाली आहे... ज्योतिषाच्या नावाखाली महिलांची आणि मुलींची फसवणूक करणाऱ्या या संशयिताचा एक अत्यंत धक्कादायक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर वेगाने प्रसारित होत आहे. या व्हिडिओमध्ये खरात एका अल्पवयीन मुलीवर उपचाराचा बनाव रचताना दिसत असून, त्या बहाण्याने त्याने पीडितेसोबत अश्लाघ्य कृत्य केल्याचे उघड झाले आहे. तांत्रिक उपकरणांचा वापर करून अघोरी पद्धतीने उपचार करत असल्याचे भासवून त्याने या मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार व्हिडीओतून समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी हा व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केल्यानंतर खळबळ उडाली असून, खरातच्या काळ्या कृत्यांचा पाढा आता लांबताना दिसत आहे.
हेही वाचा : बंदुकीचा धाक दाखवून महिला पोलिसावर लैंगिक अत्याचार, आधी लग्नाचे दिले आमिष... लाज आणणारी घटना
इंटरनेट केबल आणि टेस्टर वापरुन मुलीचा छळ?
इंटरनेट केबल आणि टेस्टर यांसारख्या तांत्रिक साधनांचा वापर करून तो दैवी शक्तीचा दावा करत असे, मात्र प्रत्यक्षात त्यामागे केवळ विकृत मानसिकतेतून केलेले शोषण असल्याचे तपासात निष्पन्न होत आहे. पोलीस उपआयुक्त तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेले विशेष तपास पथक (SIT) या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत असून, जप्त करण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधून आणखी काही गंभीर बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अशोक खरातचे अनेक व्हिडीओ पोलिसांच्या हाती










