बंदुकीचा धाक दाखवून महिला पोलिसावर लैंगिक अत्याचार, आधी लग्नाचे दिले आमिष... लाज आणणारी घटना

मुंबई तक

crime news : एका महिला पोलीस अधिकाऱ्यावर बंदूकीचा धाक दाखवूल लैंगिक अत्याचार करण्यात आला. या महिलेनं अतिरिक्त पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली होती. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. 

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बंदुकीचा धाक दाखवून पोलीस महिलेवर अत्याचार

point

लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी शरीरसंबंध 

Crime news : उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं, ओराई येथे तैनात असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्यावर बंदूकीचा धाक दाखवूल लैंगिक अत्याचार करण्यात आला. या महिलेनं अतिरिक्त पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली होती. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. 

हे ही वाचा : जालना : कपडे धुताना लेकीचा पाय घसरून थेट खदानीत पडली, आई वाचवायला जाताच माय लेकीचा पाण्यात पडून दुर्दैवी अंत

बंदुकीचा धाक दाखवून पोलीस महिलेवर अत्याचार

संबंधित प्रकरणात शहरातील एका वस्तीत राहणाऱ्या महिलेनं अतिरिक्त पोलिसांनी सांगितलं की, 2019 मध्ये तिच्या ओळखीच्या एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणं सुरुच ठेवलं होतं. तिच्यावर छळ करत तिला मानसिक त्रास दिला होता. जेव्ह तिने त्याच्यापासून स्वत:ला दूर ठेवले, त्याने तिला तिच्या एका खोलीत नेत धमकावले आणि बंदुकीचा धाक धाकवत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. 

लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी शरीरसंबंध 

संबंधित महिलेनं पोलीस अधीक्षक प्रदीप कुमार वर्मा यांना सांगितलं की, पोलीस खात्यात नोकरी करत होते. त्यांच्या मृत्यूनंतर ती घरात एकटीच होती. याच काळात तिला लग्नाचे आमिष दाखवण्यात आले आणि वेळोवेळी शरीसंबंध ठेवण्यात आले. जेव्हा तिने लग्नाचा दबाव आणला, तेव्हा तो तिच्यापासून दूर होऊ लागला होता. नंतर तरुण संतापला आणि त्याने तिच्या शासकीय निवास्थानी दाखल होत शिवीगाळ केली. लोकांनी मध्यस्ती केल्यानंतर त्याने धमकी दिली आणि तो निघून गेला. 

हे ही वाचा : धाराशिवमध्ये लोककलेच्या नावावर वेश्या व्यवसाय, 4 कला केंद्रांवर घडला प्रकार; 'असं' बाहेर आलं प्रकरण

काही दिवसांपूर्वी ती तिच्या खोलीत असताना, मद्यधुंद व्यक्ती तिच्या घरात घुसला आणि बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावर जबरदस्ती करू लागला होता. आवाज ऐकतात नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली, त्याचदरम्यान आरोपी पीडितेला जर कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन पळून गेला.  

हे वाचलं का?

    follow whatsapp