मदरशात 70 वर्षीय मौलानाने अल्पवयीन मुलीवर केलं नको तेच... कोणाला काहीही न सांगण्याची दिली धमकी अन् पुढे...

मुंबई तक

• 06:06 PM • 23 Mar 2026

Crime News : एका मदरशात माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. संबंधित मदरशात एका 70 वर्षीय मौलानाचं काळं सत्य समोर आलं आहे. व्हिडिओत एक मौलाना मदशात शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत असल्याचं दिसत आहे.

Mumbai Tak
Google CTA

बातम्या हायलाइट

point

अल्पवयीन पीडितेवर मदरशात जबरदस्ती

point

पीडितेच्या कुटुंबियांकडून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

Crime News : उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरातील एका मदरशात माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. संबंधित प्रकरणातून एका 70 वर्षीय मौलानाचं काळं सत्य समोर आलं आहे. व्हिडिओत एक मौलाना मदशात शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत असल्याचं दिसत आहे. मौलानाचे नाव इकबाल असे आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : पोटच्या दोन लेकींना आईने संपवलं, पोलिसांनी केली अटक, नेमकं काय घडलं?

अल्पवयीन पीडितेवर मदरशात जबरदस्ती

सांगण्यात येतंय की, कुटुंबीयांना व्हायरल झालेल्या व्हिडिओची माहिती मिळताच, त्यांनी पीडित विद्यार्थिनीशी संवाद साधला असता, पीडितेनं कुटुंबियांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. मौलानाने पीडितेशी मदरशात जबरदस्ती केली होती, नंतर तिला याबाबत कोणाला काहीही न सांगण्याची धमकी देखील दिली होती. यानंतर कुटुंबियांनी मौलानाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. 

पीडितेच्या कुटुंबियांकडून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

7 सप्टेंबर 2024 रोजी मौलाना इक्बालने मदरशातील एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केला. अज्ञात व्यक्तीने ही घटना मोबाईल फोनमध्ये गुपचूप रेकॉर्ड केली. संबंधित व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाल्याची माहिती आहे. पीडितेच्या कुटुंबियांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी मौलाना इक्बाल याला तुरुंगात पाठवले. त्याच्यावर पॉक्सो आणि बीएनएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. 

हे ही वाचा : कोल्हापूरमधील वाडी जोतिबा मंदिरात पुजाऱ्यांकडून भाविकांना जबर मारहाण, गुलालासह नारळ फेकून मारल्याचे कृत्य

या प्रकरणी आदित्य बन्सल म्हणाले की, वृद्ध मौलानाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. व्हिडिओची दखल घेऊन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.