Crime News : शिक्षकाच्या अनैसर्गिक सेक्सच्या मागणीला वैतागून विद्यार्थ्याने त्या शिक्षकाचा खून केल्याची घटना समोर आली आहे. घटनेनंतर तब्बल 56 दिवसांनी या घटनेचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. 17 जानेवारी रोजी छत्तीसगडमधील कवर्धा परिसरात एका शिक्षकाचा मृतदेह सापडला होता. त्यानंतर पोलिस या हत्याकांडाचा उलगडा करण्याचा प्रयत्न करत होते.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पुणे : 'माझी शेजारीण गोरीपान..', रशियन महिलेच्या रुममध्ये घुसला इंजिनिअर तरुण; पुढे काय घडलं?
500 हून अधिक सीसीटीव्हींची तपासणी
या गुन्ह्यातील आरोपीपर्यंत पोहोचणे पोलिसांसाठी मोठे आव्हान होते. तपासासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती आणि आरोपीची माहिती देणाऱ्यास 10 हजार रुपयांचे बक्षीस देखील जाहीर करण्यात आले होते. पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सुमारे 5 हजार मोबाईल क्रमांकांचे तांत्रिक विश्लेषण केले आणि 500 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. या दीर्घ प्रक्रियेत 100 हून अधिक संशयितांची चौकशी केल्यानंतर पोलिसांचा संशय एका अल्पवयीन मुलावर स्थिरावला, ज्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला वेग आला.
अनैसर्गिक सेक्सची मागणी
संशयाच्या आधारे ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन मुलाने पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याने सांगितले की, सत्यम मानिकपुरी हा शाळेत डान्स टीचर होता. तो वारंवार मानसिक त्रास देऊन ब्लॅकमेल करत होता. अनैसर्गिक सेक्सची मागणी करत होता. या जाचाला कंटाळून स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याने सत्यमची हत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला. आरोपीने सांगितल्यानुसार पोलिसांनी हत्येसाठी वापरलेला चाकू, गुन्ह्यात वापरलेली स्कूटी, रक्ताने माखलेले कपडे आणि पुरावा नष्ट करण्यासाठी नदीत फेकलेला मोबाईल फोन जप्त केला आहे. हे सर्व पुरावे पोलिसांचा दावा अधिक बळकट करणारे ठरले आहेत.
हे ही वाचा : दहावीची परीक्षा सुरु असताना शिक्षकाने सात विद्यार्थीनींशी केले अश्लील कृत्य, परीक्षेदरम्यान परिसरात गदारोळ
न्यायालयीन कार्यवाही सुरु
सध्या पोलिसांनी या अल्पवयीन आरोपीला कायदेशीर प्रक्रियेनुसार ताब्यात घेतले असून पुढील न्यायालयीन कार्यवाही सुरू आहे. दोन महिने उलटल्यानंतर या प्रकरणाचा छडा लागल्याने कवर्धा शहरात पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. पोलीस या प्रकरणातील इतरही काही बाजूंचा तपास करत आहेत, जेणेकरून कायद्यानुसार योग्य आणि कठोर कारवाई सुनिश्चित करता येईल.
ADVERTISEMENT











