Crime news : एकाच कुटुंबातील तब्बल पाच जणांचा मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना आहे. एका भाडेतत्त्वावर राहणाऱ्या घरात तीन निष्पाप मुलांसह कुटुंबातील पाच सदस्यांचे मृतदेह आढळून आले. या घटनेनं परिसरात एकच खळबळ माजली. प्राथमिक तपासातून समोर आले की, सामूहिक आत्महत्येची घटना असून, दोन महिलांनी आपल्या मुलांची हत्या केल्यानंतर स्वत:चे जीवन संपवले. ही घटना केरळातील कोची शहरात घडल्याचे वृत्त आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : यवतमाळ : 6 वर्षाची मुलगी बेपत्ता, 'एवढ्या' दिवसानंतर पोत्यात कोंबलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, गावातील घराची झडती सुरु
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये श्रीकुमारी (वय 58), त्यांची मुलगी अश्वथी नायर (वय 36) आणि अश्वथीच्या तीन मुलांचा समावेश आहे. मुलांमध्ये 14 आणि 4 वर्षांचे दोन मुलं आणि 2 वर्षांच्या एका मुलीचा देखील त्यात समावेश आहे. हे कुटुंब मूळचे तिरुवनंतपुरम येथील विलाप्पिलसाला येथील रहिवासी आहे.
तपासातून उघडकीस आलं की, हे कुटुंब फेब्रुवारी महिन्यापासून कोचीतील वदुथला येथील करास्का रोडवरील भाडेतत्त्वाच्या घरात राहत होते. कुटुंबातील थोरल्या मुलावर जवळच्याच एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते आणि त्याची काळजी घेण्यासाठी तिथेच राहत होते. दरम्यान असे वृत्त की, ते लवकरात लवकर घर खाली कारणार होते, परंतु त्यापूर्वीच ही भीषण घटना घडल्याचे वृत्त आहे.
दोन महिला गळफासाला लटक्याचे पाहून मोठा धक्का
दरम्यान, ही घटना शनिवारी दुपारी घडली, एक टेबल टीव्ही ऑपरेटर कामासाठी त्या घरी आला होता. त्याने खिडकीतून खोलीत डोकावून पाहिले, तेव्हा दोन महिला गळफासाला लटक्याचे पाहून मोठा धक्का बसला होता. ऑपरेटरने आरडाओरड केली आणि आजूबाजूच्या लोकांना व पोलीसांना याबाबतची माहिती दिली होती.
मुलांना विष पाजल्याचा पोलिसांना संशय
घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी घरातून एक सुसाईड नोट जप्त केली. श्रीकुमारी आणि अश्वथी यांनी स्वत: गळफास घेण्याआधी तीन मुलांना विष दिल्याचा पोलिसांना संशय आहे. शवविच्छेदन अहवाल आणि फॉरेन्सिक तपासातून मृत्यूचे नेमकं कारण स्पष्ट होईल.
हे ही वाचा : अशोक खरात प्रकरण: 2 मित्र, 2 FIR आणि कंबरेजवळ घेतलेले पाय.. खळबळ उडवून देणारी Inside Story
सुसाईड नोटच्या आधारे. एका कुटुंबाचा अंत होण्यामागील कारण पोलीस शोधत आहेत. आर्थिक अडचण, तसेच रुग्णालयातील उपचारांचा ताण, पोलीस या प्रत्येक पैलूंचा तपास करत आहेत.
ADVERTISEMENT











