शवागारातून नग्नावस्थेत पळाला तरुण, बाहेर येऊन सांगितलं 'ते' भयानक सत्य

Crime News : एका सरकारी रुग्णालयातील वीस वर्षीय तरुणाला डॉक्टरांनी कोणतीही सखोल तपासणी न करता मृत घोषित केले. यानंतर त्या तरुणाचा मृतदेह पोस्ट मार्टमसाठी पाठवून दिला. मात्र यानंतर जे घडलं त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. नेमकं काय झालं जाणून घेऊया. 

crime news

crime news

मुंबई तक

• 07:11 AM • 24 Mar 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

शवागारातून नग्नावस्थेत पळाला तरुण

point

बाहेर येऊन सांगितलं 'ते' भयानक सत्य

Crime News : भारतातील प्रशासकीय यंत्रणा कशी आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. सरकारी काम अन् चार महिने थांब अशी म्हणच मराठी भाषेत प्रचलित आहे. वेळोवेळी आपल्या प्रशासनाचे वाभाडे निघतानाही आपल्याला दिसतात. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  एका सरकारी रुग्णालयातील वीस वर्षीय तरुणाला डॉक्टरांनी कोणतीही सखोल तपासणी न करता मृत घोषित केले. यानंतर त्या तरुणाचा मृतदेह पोस्ट मार्टमसाठी पाठवून दिला. मात्र यानंतर जे घडलं त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. नेमकं काय झालं जाणून घेऊया. 

हे वाचलं का?

मानसिक तणावामुळे जॉनचा आत्महत्येचा प्रयत्न

मध्य प्रदेशातील गुना जिल्हा रुग्णालयातील ही घटना आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जॉन पार्टी हा तरुण मानसिक तणावाखाली होता आणि त्याने 11 मार्च रोजी विषारी पदार्थ प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. गंभीर अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथील डॉक्टरांनी घाईघाईने त्याला मृत घोषित केले. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, नियमानुसार आवश्यक असलेल्या प्राथमिक तपासण्या न करताच त्याला शवागारात पाठवण्यात आले. काही वेळातच पोस्ट मार्टमसाठी प्रक्रिया सुरू होणार होती. मात्र शवागरात असतानाच मृत समजल्या जाणाऱ्या तरुणाच्या शरीराची हालचाल सुरू झाली.

हे ही वाचा : प्रियकरासोबत लग्न करायचं म्हणून ख्रिश्चन मुलगी मुस्लिम झाली, पण शेवटी नवऱ्याने चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकलं, दोन्ही डोळे गेले

..तर मला जिवंत चिरले असते

शुद्धीवर येताच आपण शवागरात आहोत हे पाहून जॉन प्रचंड घाबरला आणि त्याच अवस्थेत बाहेरच्या दिशेने धावू लागला. एका मेलेल्या व्यक्तीला जिवंत होऊन धावताना पाहून रुग्णालय परिसरात एकच पळापळ आणि घबराट निर्माण झाली. रुग्ण, नातेवाईक आणि रुग्णालयातील कर्मचारी हे दृश्य पाहून अवाक झाले. 'जर मला वेळेवर शुद्ध आली नसती, तर डॉक्टरांनी मला जिवंत असतानाच चिरले असते,' असे विधान जॉनने शुद्धीवर आल्यानंतर केले.  हे ऐकून उपस्थित सर्वांच्या अंगावर शहारे आले.

हे ही वाचा : चॉकलेट दिले अन् दुकानातच..., दुकानदाराने सहा वर्षांच्या चिमुकलीसोबत काय केले?

डॉक्टरांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

या घटनेचा व्हिडिओ आणि माहिती सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. दोषी डॉक्टरांवर आणि रुग्णालय प्रशासनावर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. या गंभीर प्रकरणावर अद्याप रुग्णालय प्रशासनाने कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही, ज्यामुळे लोकांचा संताप अधिकच वाढत आहे. ही घटना सरकारी रुग्णालयांच्या विश्वासार्हतेवर आणि डॉक्टरांच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे.