3 हजार खासगी व्हिडिओ बनवले, अखेर डॉक्टर एकतर्फी प्रेमप्रकरणात अटक

मुंबई तक

crime news : क्लिनिकमध्ये स्पाय कॅमेरा वापरून महिला डॉक्टरांसोबतच्या खाजगी क्षणांचे व्हिडिओ रेकॉर्ड केले. याचप्रकरणी डॉक्टर आणि स्थानिक पत्रकारांविरुद्ध सायबर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी डॉ. कमल नंदा यांना अटक केली.

ADVERTISEMENT

crime news
crime news
google news

बातम्या हायलाइट

point

डॉक्टरने गुप्त कॅमेऱ्यातून तब्बल 3 हजारांहून अधिक व्हिडिओ रेकॉर्ड केले

point

डॉ. कमल नंधा यांच्यासह इतर 12 आरोपींवर कारवाई

Crime News : गुजरातच्या राजकोटमध्ये क्लिनिकमध्ये स्पाय कॅमेरा वापरून महिला डॉक्टरांसोबतच्या खाजगी क्षणांचे व्हिडिओ रेकॉर्ड केले. याचप्रकरणी डॉक्टर आणि स्थानिक पत्रकारांविरुद्ध सायबर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी डॉ. कमल नंदा यांना अटक केली आहे. 

हे ही वाचा : सोलापूरमध्ये उन्हाच्या कडाक्यात थंडावा मिळवण्यासाठी जिवलग मित्र पोहायला गेले, तलावात बुडून दोघांचा दुर्दैवी अंत

डॉक्टरने गुप्त कॅमेऱ्यातून तब्बल 3 हजारांहून अधिक व्हिडिओ रेकॉर्ड केले

प्राथमिक तपासातून असे समोर आले की, या डॉक्टरने गुप्त कॅमेऱ्यातून तब्बल 3 हजारांहून अधिक व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवले होते आणि स्थानिक पत्रकारांद्वारे पैशांची मागणी करत होता. सध्या 11 खंडणीखोर फरार असून, पुराव्यांच्या आधारे त्यांना पकडण्यासाठी पुढील तपास करण्यात आला आहे. 

डॉ. कमल नंधा यांच्यासह इतर 12 आरोपींवर कारवाई

राजकोट सायबर क्राईमचे एसीपी चिंतन पटेल यांनी सांगितलं की, 20 मार्च रोजी राजकोट शहर सायबर क्राइम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. भारतीय संहिता कलमान्वये 308 (5), 308 (4), 35 (2), 356 (3), 54 आणि 61 तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66 (E) 67 आणि 67 (A) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात डॉ. कमल नंधा यांच्यासह इतर 12 आरोपींचा समावेश असल्याची माहिती आहे. 

हे ही वाचा : अनामिकेला जखम कशी झाली? स्पष्टीकरण देण्यासाठी रुपाली चाकणकरांनी थेट व्हिडीओ केला पोस्ट

दरम्यान, राजकोट शहर पोलिसांनी पत्रकार असल्याचे भासवून शहरातील लोकांकडून पैसे उकळणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरु केली. खंडणी आणि पैशांची धमकी दिल्याबद्दल एका डॉक्टरसह 12 जणांविरुद्ध सायबर क्राइम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. राजकोटमधील साधू वासवानी रोडवरील एका नोंदणीकृत डॉक्टरच्या क्लिनिकच्या ऑफिस रूममधील बल्ब होल्डरमध्ये एक छुपा सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आला होता. एका महिलेसोबतचा खासगी अक्षेपार्ह व्हिडिओ प्रसिद्ध करण्याची धमकी देऊन 2.5 लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. 

हे वाचलं का?