अनामिकेला जखम कशी झाली? स्पष्टीकरण देण्यासाठी रुपाली चाकणकरांनी थेट व्हिडीओ केला पोस्ट
Rupali Chakankar : रुपाली चाकणकर या तंत्र-मंत्र विद्या करायच्या. त्यासाठी त्यांनी स्वत:ची अनामिका कापली होती, असा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला होता. यावर आता चाकणकर यांनी स्पष्टीकरण दिलंय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अनामिकेला जखम कशी झाली?
स्पष्टीकरण देण्यासाठी रुपाली चाकणकरांनी व्हिडीओ पोस्ट केला
Rupali Chakankar : भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांचा पर्दाफाश झाल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. रुपाली चाकणकर या भोंदबाबाला गुरु मानायच्या, हे देखील समोर आलं होतं. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी तर थेट चाकणकर या तंत्र-मंत्र विद्या करायच्या, असा आरोप केला. इतकंच नाही तर अघोरी प्रकार करण्यासाठी रुपाली चाकणकर यांनी स्वत:ची अनामिका कापली, असं अंधारे यांनी म्हटलं होतं. दरम्यान, याबाबत आज (दि.24) रुपाली चाकणकर यांनी स्पष्टीकरण दिलंय. त्यांनी यासाठी धायरीतील काही लोकांचा व्हिडीओ पोस्ट केलाय. यामध्ये ते चाकणकर यांच्या अनामिकेला जखमी कशी झाली? ते सांगत आहेत.
रुपाली चाकणकरांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओला कॅप्शन काय दिलं?
व्हिडीओ पोस्ट करताना चाकणकर यांनी कॅप्शन देखील दिलं आहे. त्या म्हणाल्या, "गेली वीस बावीस वर्ष सामाजिक,राजकीय क्षेत्रात काम करताना ,जसजसा प्रगतीचा आलेख वाढत गेला तशतशी चिखलफेक करणारी विकृती वाढत गेली. प्रत्येक वेळी संयमाने शांतपणाने टिका सहन केली,वैयक्तिक टिका करणे हे माझ्या रक्ताताच नाही.पण आता सगळ्या मर्यादा ओलांडून माझ्यासह कुटुंबाला जो त्रास दिला जातोय ते भयावह आहे. ज्यांनी हा आयुष्याचा प्रवास जवळून पाहिलाय ,ते सर्व संपर्क करून “आम्ही सोबत आहोत “हे आवर्जून सांगतात.त्या सर्वांचे आभार. खरात प्रकरणात मी पहिल्या दिवशीच भूमिका स्पष्ट केली आहे .तपास निष्पक्षपणे व्हावा यासाठी आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला व त्यानंतरही माझ्यावर केलेल्या आरोपांचे पुराव्यासह स्पष्टीकरण दिले आहे.सत्य समोर येईलच. धायरीकर तुमचे मनापासून धन्यवाद!!"
मंडळाचा अध्यक्ष स्पष्टीकरण देताना काय म्हणाला?
रुपाली चाकणकर यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये विघ्नहर्ता मित्रमंडळाचे अध्यक्ष मयूर दुघाणे बोलताना पाहायला मिळत आहेत. ते म्हणाले, "रुपाली ताई दरवर्षी आमच्या मंडळात आरतीला येतात. 9 सप्टेंबर रोजीही ताई आरतीसाठी आल्या होत्या. गाडीतून उतरताना दरवाजात बोट अडकल्याने त्यांना जखम झाली. रक्त वाहत होते, तशाच स्थितीत त्या बोटाला टिश्यू पेपर लावून आरतीसाठी आल्या. मंडळाच्या पेजवर आजही हा व्हिडिओ उपलब्ध आहे, ज्यामध्ये ताईंच्या बोटाला लागल्याचे दिसत आहे. आत्ता व्हायरल होत असलेला फोटोबाबत ध चा म केल्याचे दिसत आहे. कोणतीही शहानिशा न करता खोटे आरोप केले जात आहेत. ताईंबद्दल चुकीचा मेसेज फिरत आहे, आम्ही याचा निषेध करतो."









